कृषी मंत्रालय
स्वयंपूर्ण गोवा- कृषी क्षेत्रासाठी कोविड-19 परिस्थितीत नाबार्डकडून सहाय्य
नाबार्डकडून कमी खर्चाचे पॉलीहाऊस प्रकल्प
Posted On:
10 DEC 2020 7:02PM by PIB Mumbai
पणजी, 10 डिसेंबर 2020
कोविड-19 संक्रमणामुळे गोवा राज्यातील युवकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे उलट स्थलांतर सुरु झाले आणि याचा पर्यटनावर आधारीत असलेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अशा परिस्थितीत नाबार्डने पुढाकार घेऊन कमी खर्चाचे पॉली हाऊस प्रकल्प सुरु केले, यामुळे बेरोजगार युवकांना आणि बचत गट सदस्यांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. नाबार्डने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेला (ATMA) पाच तालुक्यांमध्ये 10 नर्सरी मंजूर केल्या आहेत. नाबार्डच्या महाव्यवस्थापक श्रीमती उषा रमेश आणि इतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन याविषयी संवाद साधला. दसरा आणि दिवाळीच्या काळात याचा चांगला लाभ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने (आत्मा) रोपवाटिका उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
रोजगारासंबंधीच्या या अनोख्या प्रकल्पामुळे युवक शेतीकडे आकर्षित झाले असून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या माध्यमातून स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना खर्या अर्थाने साकार झाली आहे, कारण पूर्वी रोपे महाराष्ट्र राज्यातून आणली जात असत आणि दुप्पट दराने त्यांची विक्री केली जात असे. कोविड-19 काळात प्रकल्पाचे लाभ समोर आले आहेत, त्यामुळे आता राज्यभर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाऊ शकते.
***
S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679745)
Visitor Counter : 155