संरक्षण मंत्रालय
कोविड महामारीच्या काळामध्ये गोवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी - श्रीपाद नाईक
अत्याधुनिक जीवन सहाय्यक रूग्णवाहिका गोवा पोलिसांच्या स्वाधीन
प्रविष्टि तिथि:
23 NOV 2020 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 23 नोव्हेंबर 2020
कोरोना महामारीच्या काळामध्ये गोवा पोलिसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली, त्याच्या परतफेड म्हणून सीएसआरच्या माध्यमातून गोवा शिपयार्डच्या वतीने गोवा पोलिस दलाला अत्याधुनिक जीवन सहाय्यक रूग्णवाहिका देण्यात आली. या रूग्णवाहिकेची किंमत 23.80 लाख रूपये आहे. बंगलुरूस्थित भारत इलेक्ट्रिॉनिक्स लिमिटेडने (बीईएल) ही गाडी तयार केली असून त्यामध्ये कर्करोग निदान करण्यासाठी आवश्यक असलेली 2.50 कोटीची अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा बसविण्यात आली आहे, अशी माहिती आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.
पणजी पोलिस मुख्यालयामध्ये जीवन सहाय्यक रूग्णवाहिका गोवा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना, गोवा शिपयार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सीएमडीई बी.बी.नागपाल उपस्थित होते.





M.Chopade/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1675201)
आगंतुक पटल : 167
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English