अर्थ मंत्रालय

मुंबईतील जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाकडून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार करून पुढे पाठवणाऱ्या चार व्यक्तींना अटक

Posted On: 11 NOV 2020 11:12PM by PIB Mumbai

मुंबई,  11 नोव्हेंबर 2020

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने, 10 नोव्हेंबर, मंगळवारी चार व्यक्तींना अटक केली. यात मेसर्स राणे मेगास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, मेसर्स एसीएस हार्डवेअर अँड नेट्वर्किंगचे प्रोप्रायटर, केसरिया मेटल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि मेसर्स शैलजा कमर्शियल ट्रेड फ्रान्स्झी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यांचा समावेश आहे. या चौघांनी, त्यांच्याकडे असलेल्या बिलांच्या आधारे , वस्तू आणि सेवांचा कुठलाही पुरवठा न करताच, एकूण 408.67 कोटी रुपये मूल्याचे  बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट तयार केले आहेत.

या संदर्भात केलेल्या तपासानुसार,  मेसर्स एसीएस हार्डवेअर अँड नेट्वर्किंग ने सुमारे 85.38 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी तयार केले, त्यानंतर तेच आयटीसी मेसर्स राणे मेगास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडकडे पाठवण्यात आले. यासाठी कोणताही पुरवठा न करता तयार केलेल्या बिलांचा वापर करण्यात आला, ज्यांचे करमूल्य 474 कोटी रुपये इतके आहे. मेसर्स राणे मेगास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने 85.44  कोटी रुपयांचे आयटीसी दुसऱ्या कंपनीकडे पाठवले, मात्र कोणताही पुरवठा केला नाही.

या गुन्हे साखळीत, हे बनावट आयटीसी अशाप्रकारे पाठवले गेले ,ते शेवटच्या लाभार्थ्याला त्यांचा आउटपूट  टॅक्स चे पेमेंट करण्यासाठी किंवा कर परतावा घेण्यासाठी वापरता आले.या गुन्हेगारी टोळीतील काही लोकांना याआधीच अटक करण्यात आली आहे.

आणखी एका प्रकरणामध्ये, केसरिया मेटल प्रायव्हेट लिमिटेड, काजल ट्रेडिंग कंपनी, मेसर्स हाय टेक इम्पेक्स आणि कंपन्या यांनी एकत्रितपणे बनावट बिले  तयार केली आणि त्या आधारावर अवैध आयटीसी तयार करून ते पुढे पाठवले. यासाठी वस्तू आणि सेवेचा कुठला ही पुरवठा करण्यात आला नाही. या पद्धतीतून बनावट  व्यवहार करत त्यांनी एकूण 103.78  कोटी रुपयांचे बनावट आयटीसी तयार केले.

आणखी एका वेगळ्या प्रकरणी मेसर्स शैलजा कमर्शिअल ट्रेड फ्रेन्झी लिमिटेड यांनीही  48.69  कोटी रुपये मूल्याच्या बनावट बिलांच्या आधारे  खोटे आयटीसी तयार केले.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या कलम 132 नुसार अशी बनावट बिले आणि आयटीसी बनवणे दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.

या चौघांनाही, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017च्या कलम 132 आणि  69 (1)  खाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 24 नोव्हेंबरपर्यंतची न्यायालयीन कोठडी दिली असून पुढील तपास सुरु आहे.

 

Jaydevi.P.S/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1672124) Visitor Counter : 125


Read this release in: English