ग्रामीण विकास मंत्रालय

2020-21 दरम्यान आरआयडीएफ योजनेंतर्गत गोवा सरकारला नाबार्डने 8504.30 लाखांहून अधिक कर्जाला दिली मंजुरी

Posted On: 29 OCT 2020 9:26PM by PIB Mumbai

 

नाबार्डने राज्यातील विविध सामाजिक पायाभूत  प्रकल्पांसाठी ग्रामीण पायाभूत  विकास निधी (आरआयडीएफ) अंतर्गत गोवा सरकारला 8504.30 लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. याद्वारे, नाबार्डने 2020-21 दरम्यान राज्य सरकारला मंजूर केलेल्या उद्दिष्टाचे 100% साध्य केले असे  नाबार्डच्या महाव्यवस्थापक / ओआयसी उषा रमेश यांनी सांगितले. मध्यम आणि सूक्ष्म  सिंचन, मृदा संवर्धन आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या इतर प्रकल्पांशी संबंधित प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्य सरकारच्या मालकीच्या महामंडळांना कमी खर्चात सहाय्य पुरवणे या उद्देशाने आरआयडीएफची स्थापना नाबार्डमध्ये करण्यात आली आहे असे त्या म्हणाल्या. राज्यातील सीवरेज, बायो डायजेस्टर शौचालये, पेयजल पुरवठा, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादींसाठी मंजूर प्रकल्पांमधून तयार केलेल्या सामाजिक पायाभूत सुविधांमुळे राज्यातील लोकांचे जीवनमान तर सुधारेल शिवाय पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत अभियानाला  निश्चितच हातभार लागेल.

****

B.Gokhale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668663) Visitor Counter : 123


Read this release in: English