पोलाद मंत्रालय

स्टील आयातीत कपात करण्यासाठीच्या उपाययोजना

Posted On: 21 SEP 2020 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर  2020

 

सरकारने स्टील आयातीत कपात करण्यासाठी पुढील उपाययोजना हाती घेतल्या आहेत:-

 (i) स्टील आयातीची आगाऊ नोंदणी करण्यासाठी स्टील आयात देखरेख प्रणाली (SIMS). देशांतर्गत उत्पादनाची योजना आखण्याकरिता देशातील आयात करण्यात येत असलेल्या स्टीलची गुणवत्ता ओळखणे, सरकारला आणि उद्योगांना मदत करणे, तसेच आयातीतील वाढीबाबतची आगाऊ माहिती देणे हा उद्देश.

(ii) प्रमाणीत नसलेल्या स्टीलची आयात आणि उत्पादन रोखण्यासाठी स्टील गुणवत्ता नियंत्रण आदेश (SQCO) जारी करणे आणि देशात उच्च दर्जाच्या स्टीलची उपलब्धता सुनिश्चित करणे.

(iii) मूल्यवर्धित स्टील, सहाय्यक वस्तू, भांडवली वस्तू इत्यादींसाठी उत्पादक युनिट्सवर लक्ष केंद्रित करून स्टील क्लस्टर उभारण्यास प्रोत्साहन देण्यासाठी योजना तयार करणे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Iyengar/S.Thakur/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1657280) Visitor Counter : 80


Read this release in: English , Manipuri , Tamil