कंपनी व्यवहार मंत्रालय

एमसीएतर्फे SPICe + पोर्टल तैनात

Posted On: 19 SEP 2020 10:34PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

कॉर्पोरेट व्यवहार  (एमसीए)  मंत्रालयाने, भारत सरकारच्या इझ ऑफ  डूइंग बिझिनेस (ईओडीबी)  या उपक्रमांचा एक भाग म्हणून  ‘एसपीआयसी+’ (उच्चारित एसपीआयसी प्लस)नावाची अधिसूचना वेब-फॉर्म  जीएसआर क्रमांक 128 दिनांक 18.02.2020 (23.02.2020 पासून प्रभावी) जारी केली . केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री श्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात हे सांगितले.

या संदर्भात अधिक माहिती देताना श्री ठाकूर म्हणाले की, केंद्र सरकारची  तीन मंत्रालये   (कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि अर्थ मंत्रालया महसूल विभाग), तसेच एक राज्य सरकार (महाराष्ट्र) तर्फे  10 सेवा  प्रदान करण्यात येतात. विविध बँका, त्याद्वारे भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा   वेळ , मूल्य संदर्भातील सेवाहि या मध्ये समाविष्ठ आहेत.

या 10 सेवा खालीलप्रमाणेः

  1. नाव आरक्षण
  2. निगमन
  3. डीआयएन वाटप
  4. पॅन अनिवार्य करणे
  5. टीएएन अनिवार्य करणे
  6. ईपीएफओ नोंदणीचा अनिवार्य मुद्दा
  7. ईएसआयसी नोंदणीचा अनिवार्य मुद्दा
  8. प्रोफेशन टॅक्स नोंदणीचा अनिवार्य मुद्दा (महाराष्ट्र)
  9. कंपनीसाठी बँक खाते अनिवार्य उघडणे आणि
  10. जीएसटीआयएन (जर अर्ज केला असेल तर) वाटप.

एकतर प्रथम नाव आरक्षित करण्यासाठी भाग-ए सबमिट करणे, कंपनीच्या समावेशनासाठी, एकत्रित  नोंदणी , भाग  ब  सादर करणे आणि  भाग ए आणि बी एकत्रितपणे दाखल हे पर्याय  निवडू शकतात. नवीन वेब फॉर्ममुळे कंपन्यांच्या अखंडित अंतर्भूततेसाठी ऑन-स्क्रीन फाइलिंग आणि रीअल टाइम डेटा प्रमाणीकरण सुलभ होते.

मिळणाऱ्या लाभांचा उल्लेख करताना मंत्री  महोदयांनी  लेखी स्वरूपात पुन्हा नमूद केले की वरील नवीन वेब फॉर्म सादर केल्यानंतर प्रक्रियेची संख्या आधीच्या 10 च्या तुलनेत 3 करण्यात आली आहे आणि देशात व्यवसाय सुरु करण्याचा कालावधी 18 दिवसांऐवजी 4 दिवस करण्यात आला  आहे.

पुढे दिनांक 06.03. 2019 च्या अधिसूचना क्र. 180  नुसार जी 18.03.2019  पासून लागू झाली. या मंत्रालयाने कंपन्या (समावेश) नियम 2014 मध्ये बदल केला असून त्याअंतर्गत अधिकृत भांडवलासह सर्व कंपन्यांचा समावेश करण्यासाठी शून्य शुल्क आकारले जात आहे. 15 lakh लाख किंवा 20 सभासदांपर्यंत कोणतेही भांडवल लागू नाही, असे मंत्री म्हणाले.


* * *

B.Gokhale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656838) Visitor Counter : 199


Read this release in: English , Urdu