अर्थ मंत्रालय
कॉर्पोरेट कर्जदारांच्या वैयक्तिक हमीदारांविरोधात कारवाई करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारकडून मार्गदर्शक सूचना
Posted On:
19 SEP 2020 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
दिवाळखोरी नियम 2019 पतधारकांना कॉर्पोरेट कर्जदारांच्या वैयक्तिक हमीदारांविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे दिवाळखोरी संहिता, 2016 अंतर्गत दिवाळखोरी अर्ज दाखल करण्याचे अधिकार प्रदान करतो. केंद्रीय अर्थसाहाय्य आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
आर्थिक सेवा विभागाने वरील विषयासंदर्भात 26-8-2020 रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. कॉर्पोरेट कर्जदारांच्या वैयक्तिक हमीदारांविरोधात एनसीएलटीकडे प्रकरण दाखल करण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक देखरेख यंत्रणा निर्माण करण्याचा विचार करावा, असे त्यात म्हटले होते. अशा हमीदारांच्या संदर्भातील माहितीचे संकलन करण्यासाठी आणि तिच्या आधारे कारवाई करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान प्रणाली उभारण्याचा विचार करावा असे देखील त्यात सुचवण्यात आले होते, असे मंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656830)
Visitor Counter : 161