ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय उर्जा राज्यमंत्र्यांच्या हस्ते बिहारच्या मुझफ्फरपूर येथे REC CSR च्या 24.38 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ
सरदार हॉस्पीटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खाटांचे प्रतीक्षालय, बहुपयोगी सभागृह आणि इन्क्युबेशन केंद्राची व्यवस्था
50 अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण
प्रविष्टि तिथि:
19 SEP 2020 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 सप्टेंबर 2020
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंह यांच्या हस्ते आज बिहारमधल्या मुझफ्फरपूर येथे बांधल्या कॉर्पोरेट सेवा उत्तरदायित्वाच्या तत्वावर बांधल्या जाणाऱ्या रुग्णालयाचा कोनशिला समारंभ झाला. 24.38 कोटींच्या या प्रकल्पामुळे मुझफ्फरपूर या आकांक्षी जिल्ह्यात उत्तम रुग्णालय सेवा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाअंतर्गत :

सरदार रुग्णालयात, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खाटांचे प्रतीक्षागृह, बहुपयोगी सभागृह, आणि इनक्युबेशन केंद्र उभारले जाणार आहे. त्याशिवाय जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही 25 इनक्युबेशन केंद्रे उभारली जाणार आहेत.
त्याशिवाय, 50 अंगणवाडी केंद्रांचे नूतनीकरण देखील केले जाणार आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1656797)
आगंतुक पटल : 109