सांस्कृतिक मंत्रालय

भारतीय संस्कृती पोर्टल भारताच्या मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि दर्शन घडवते : प्रल्हाद सिंह पटेल

Posted On: 19 SEP 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 सप्‍टेंबर 2020

 

पुस्तके, नृत्य, संगीत, स्मारके, शिल्पकला, पुरातन वास्तू, भाषा इत्यादींच्या रूपात विशाल आणि वैविध्यपूर्ण मूर्त आणि अमूर्त सांस्कृतिक वारशाने भारत समृद्ध आहे संस्कृती मंत्रालयाने या सर्व सांस्कृतिक वारशांना एकाच ई-व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.  भारतीय संस्कृती पोर्टल, 10.12.2019 रोजी सुरू झाले. भारतीय संस्कृती पोर्टलवर उपलब्ध असलेली माहिती बहुभाषिक वातावरणात मुक्त स्त्रोत व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व उपलब्ध ज्ञान संसाधनांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर व्यापक प्रमाणात सार्वजनिक करण्यासाठी संस्कृती मंत्रालयांच्या अखत्यारीतील प्रख्यात सांस्कृतिक संस्थांकडून गोळा केली जाते. या सामग्रीचा पुढील मार्गांनी प्रचार केला जात आहे:

  • पोर्टलसाठी समर्पित पेजसह  फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया मंचाद्वारे प्रसिद्धी .
  • सर्व मंत्रालयीन संस्थांच्या संकेतस्थळावर  दिलेल्या लिंकद्वारे
  • मोबाइल फोन ऍप्स 
  • उमंग प्लॅटफॉर्मवर उपस्थिती.
  • 30,000 हून अधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये थेट प्रसार  

विविध सामग्री विषय  लोकांना दुर्मिळ पुस्तके, ई-पुस्तके, चित्रे,  प्रतिमा, ऑडिओ-क्लिप्स, व्हिडिओ-क्लिप इत्यादी स्वरूपात पुरवले जातात. त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे :

  1. अमूर्त सांस्कृतिक वारसा 
  2. खाद्यपदार्थ आणि संस्कृती
  3. फोटो संग्रह
  4. दुर्मिळ पुस्तके
  5. हस्तलिखिते
  6. गॅझेटियर्स
  7. भारतीय वाद्य 
  8. पुराभिलेख 
  9. संग्रहालय संग्रह
  10. प्रतिमा
  11. व्हिडिओ
  12. ऑडिओ
  13. कथा
  14. चित्रे 
  15. युनेस्को
  16. संशोधन पेपर्स
  17. ई-पुस्तके
  18. अहवाल आणि प्रक्रिया
  19. इतर संग्रह
  20. युनियन कॅटलॉग
  21. भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची

भारतीय संस्कृती पोर्टल वर नमूद केलेल्या विविध श्रेण्यांद्वारे भारताच्या मूर्त व अमूर्त अशा दोन्ही सांस्कृतिक वारशाला प्रोत्साहन देते आणि त्याचे दर्शन घडवते.  ज्यात हस्तलिखिते, संग्रहालयातील कलाकृती, चित्रकला, अभिलेखाची छायाचित्रे, खाद्य व संस्कृती, भारतीय  वाद्ये, अभिलेख कागदपत्रे, सामाजिक पद्धती, विधी, आणि उत्सव, तोंडी परंपरा आणि अभिव्यक्ती आणि दुर्मिळ पुस्तके इ. 

भारतीय संस्कृती पोर्टल सध्या हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ही माहिती संस्कृती आणि  पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) प्रह्लाद सिंह पटेल यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात दिली.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656748) Visitor Counter : 331


Read this release in: English , Manipuri , Telugu