आयुष मंत्रालय
कर्करोगावर उपचार विकसित करण्यासाठी आयुर्वेदात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना
Posted On:
18 SEP 2020 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
कर्करोगावर उपचार विकसित करण्यासाठी सरकारने आयुर्वेदात संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. आयुर्वेदिक आरोग्य सेवांमध्ये संशोधन करण्याचे आदेश देऊन सरकारने एक स्वायत्त संस्था म्हणून आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) स्थापन केली आहे.
केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) कर्करोगाशी संबंधित संशोधन देखील केले असून औषधांच्या विकासामध्ये आणि वैद्यकीय पद्धतींचे दस्तऐवजीकरण करण्यात देखील सहभागी आहे: -
- कर्करोगाच्या रुग्णांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुष क्यूओएल 2 सी चा विकास
- अंडाशयाच्या कर्करोगामध्ये स्टँडअलोन थेरपी म्हणून कार्क्टॉल एस चा विकास
- आयुर्वेद हस्तक्षेपांद्वारे कर्करोग व्यवस्थापनाच्या पद्धतशीर दस्तऐवजीकरणासाठी व्यापक एकात्मिक रुपरेषेचा विकास
- कर्करोग विरोधी औषधी वनस्पतींची चाचणी
- कर्करोगासाठी आयुर्वेद हस्तक्षेप: पद्धतशीर आढावा, मेटा-विश्लेषण; आणि पुनरुज्जीवन, दस्तऐवजीकरण, व्यावसायिक, संस्थांकडून डेटाचे प्रमाणीकरण आणि विश्लेषण
कर्करोगावर एकत्रित संशोधन करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआयआयए) आणि राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध आणि संशोधन संस्था (एनआयसीपीआर-आयसीएमआर) चा संयुक्त उपक्रम म्हणून सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी (सीआयओ) ची स्थापना केली गेली.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआयआयए) ने डॉ. बीआरए इन्स्टिट्यूट रोटरी कॅन्सर हॉस्पिटल (आयआरसीएच) आणि अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली यांच्यासमवेत समान उद्दीष्टे आणि ध्येयासह सामंजस्य करार केला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656435)
Visitor Counter : 871