वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

स्थानिक कंपन्यांना निविदा

Posted On: 18 SEP 2020 7:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2020

 

आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्थानिक कंपन्यांना निविदा वाटप करण्याकरिता खालील उपाययोजना केल्या आहेतः -

  1. स्थानिक उद्योगांच्या हितासाठी भारत सरकारच्या संस्थांकडून स्थानिक निविदा काढण्यासाठी 200 कोटी रूपांपेक्षा जास्त कराराच्या/ पुरवठा मूल्याच्या जागतिक निविदांवर मर्यादा आणण्यासाठी व्यय विभागाने 15.05.2020 रोजी आदेश क्रमांक 12/17/2019-PPD नुसार सर्वसाधारण आर्थिक नियम 2017 च्या नियम 161 (iv) मध्ये सुधारणा केली आहे.(व्यय विभागाच्या संकेतस्थळावर याची प्रत उपलब्ध आहे.)
  2. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (डीपीआयआयटी) सार्वजनिक खरेदीमध्ये स्थानिक पुरवठादारांच्या सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी (मेक इन इंडियाला प्राधान्य) सर्वसाधारण आर्थिक नियम  2017 च्या नियम 153(iii) अंतर्गत 04.06.2020 रोजी (संकेतस्थळावर प्रत उपलब्ध आहे) आदेश जारी केला आहे.
  3. शासकीय ई-मार्केटप्लेस (जीएम) पोर्टलवर देऊ केलेल्या प्रत्येक उत्पादनासाठी विक्रेत्यांनी उत्पादक देश जाहीर करणे जीएमने अनिवार्य केले आहे.

शासकीय ई-मार्केटप्लेस (जीएम) च्या उपलब्ध आकडेवारीनुसार, नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणार्‍या उत्पादनांसाठी 04.06.2020 ते 15.09.2020 दरम्यान  विविध विक्रेत्यांबरोबर 50,346 करार करण्यात आले आहेत.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1656389) Visitor Counter : 90


Read this release in: English , Tamil , Telugu