शिक्षण मंत्रालय

21व्या शतकातील महत्त्वाच्या कौशल्यांनी सुसज्ज अशा समग्र आणि सर्वांगीण व्यक्ती घडवणे  हे एनईपीचे उद्दीष्ट आहे- शिक्षण मंत्री

Posted On: 17 SEP 2020 8:12PM by PIB Mumbai

मूलभूत तत्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण  धोरण (एनईपी), 2020 मध्ये शिक्षण व्यवस्थेला तसेच त्यातील वैयक्तिक संस्थांना मार्गदर्शन  तसेच परीक्षेपुरते शिकण्याऐवजी  वैचारिक आकलनावर भर देण्यात आला आहे.  मुलांना  कसे शिकता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे.  केवळ संज्ञानात्मक विकास नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणे  आणि 21 व्या शतकातील महत्वाच्या कौशल्यांनी परिपूर्ण अशा सर्वांगीण  व्यक्ती घडवणे हे याचे उद्दिष्ट आहे.

शाळेतून बाहेर पडलेल्या मुलांना शाळांमध्ये परत आणण्यासाठी आणि शाळांमध्ये प्रभावी आणि पुरेशा पायाभूत सुविधा, प्रत्येक टप्प्यावर नियमित प्रशिक्षित शिक्षक, सुरक्षित आणि व्यावहारिक वाहतुकीची सोय आणि / किंवा वसतिगृहांचा पर्याय आणि नाविन्यपूर्ण शिक्षण केंद्रे आणि  विद्यार्थ्यांची  आणि त्यांच्या शिकण्याची पातळी लक्षात घेऊन शाळेत सार्वत्रिक सहभाग निश्चित करण्यावर एनईपीमध्ये भर देण्यात आला आहे. तसेच समग्र शिक्षणाच्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विविध उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामध्ये उच्च  माध्यमिक स्तरापर्यंत नवीन शाळा सुरू करणे / चालवणेशालेय इमारतींचे बांधकाम आणि अतिरिक्त वर्गखोल्या, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयांची स्थापना , उन्नतीकरण आणि त्या चालविणे, निवासी शाळा / वसतिगृहे सुरू करणे, मोफत गणवेश, मोफत  पुस्तके, वाहतूक भत्ता व नावनोंदणी मोहीम , शाळेबाहेरच्या विद्यार्थ्यांना  मुख्य प्रवाहात राहण्यासाठी निवासी तसेच अनिवासी प्रशिक्षण. हंगामी वसतिगृहे / निवासी शिबिरे इ. समावेश आहे. विशेष गरज असलेल्या मुलांच्या समावेशक शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देखील प्रदान केले जाते. तसेच प्राथमिक स्तरावरील  विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन  दिले जाते.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंकयांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1655839) Visitor Counter : 110


Read this release in: English , Urdu , Tamil