महिला आणि बालविकास मंत्रालय
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2020 6:19PM by PIB Mumbai
महामारीमुळे शाळा बंद असेपर्यंत, सर्व पात्र विद्यार्थ्यांना अन्नधान्य,डाळी, तेल इत्यादी (स्वयंपाक खर्चाच्या समतुल्य ) अन्न सुरक्षा भत्ता पुरवण्याच्या सूचना राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेश प्रशासनांना देण्यात आल्या आहेत.यासाठीची पद्धती संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेश, परिस्थितीनुरूप आखत आहेत. कोविड-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीच्या आवश्यक उपाययोजना आखण्याच्या सूचनाही, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.
महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
****
B.Gokhale/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1655721)
आगंतुक पटल : 207