कंपनी व्यवहार मंत्रालय

कंपन्यांकडून कंपनी कायद्याच्या तरतुदींचा भंग

Posted On: 14 SEP 2020 9:30PM by PIB Mumbai

 

कंपनी कायद्याच्या तरतुदींचा भंग करणाऱ्या  कंपन्याबाबत कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे माहिती असल्याचे केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मंत्रालयाला थेट किंवा प्रादेशिक संचालक, कंपनी रजिस्ट्रार यांच्याकडून, सार्वजनिक (व्यक्ती/ संस्था ) तसेच इतर मंत्रालयाकडूनही कंपन्याविषयी तक्रारी प्राप्त होतात.  त्यासंदर्भात तपसणी करून कंपनी कायदा 2013 नुसार कारवाई केली जाते. चौकशीचे आदेश,तपासणी, तपास इत्यादी संदर्भातल्या कंपनी कायद्याच्या कलमांना अनुसरून, प्रत्येक प्रकरणानुसार पावले उचलण्यात येतात. विविध शाखांकडून कार्यवाहीची आवश्यकता असणारे आणि व्यापक जनहिताशी संबंधित, मोठ्या रकमेचे घोटाळे असल्यास गंभीर गुन्हे तपास कार्यालयाकडे ते सोपवण्यात येतात.

 2018-19  आणि 2019-20  या गेल्या दोन वर्षातल्या चौकशी, तपास यासंदर्भातल्या आदेशांचे तपशीलही ठाकूर यांनी दिले.

No of Inquiry ordered u/s 206 (4)

No of Inspection ordered u/s 206 (5)

No of Investigation ordered u/s 210

No of Investigation ordered u/s 212 for SFIO

878

674

167

59

चौकशीतपासणी याबाबत आदेश देण्याचे कारण प्रत्येक प्रकरणात वेगवेगळे असते. घोटाळा, कंपनी कायद्याच्या तरतुदींचे पालन न करणे,कंपनी कायद्याखाली जनतेकडून घेतलेल्या ठेवींचे पैसे परत न करणे, इतर मंत्रालयाकडून प्राप्त तक्रारी अशा विविध कारणांचा यात समावेश आहे.

660 प्रकरणात चौकशी करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तथ्यावर आधारित, कंपनी कायदा 2013 च्या तरतुदीनुसार खटले दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

M.Chopade/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1654243) Visitor Counter : 103


Read this release in: English , Urdu