आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी संस्कृती, उपजीविका आणि शिक्षणाचा प्रसार
प्रविष्टि तिथि:
14 SEP 2020 5:23PM by PIB Mumbai
आदिवासी व्यवहार मंत्रालय “आदिवासी संशोधन संस्थेला समर्थन” आणि आदिवासी उत्सव, संशोधन, माहिती आणि समुदाय शिक्षण” उपक्रमांतर्गत समृद्ध आदिवासी संस्कृतीच्या प्रसारासाठी विविध संशोधन अभ्यास/पुस्तकांचे प्रकाशन/दृकश्राव्य माहितीपटाचा वापर करणार आहे. आदिवासी व्यवहाराशी संबंधित संस्था आणि व्यक्तींची क्षमतावृद्धी केली जाणार आहे आणि उत्कृष्टता केंद्रांच्या माध्यमातून विविध संशोधन अभ्यास, पुस्तकांचे प्रकाशन, दृकश्राव्य माहितीपट यांच्या माध्यमातून आदिवासीसंदर्भातील प्रश्नांसदर्भात निर्माण झालेली दरी भरुन काढण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे संग्रहालय, रांची येथे उभारण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. तसेच 78 एकलव्य मॉडेल निवासी शाळा झारखंडसाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. गौण वन उत्पादनाचा आदिवासी लाभार्थ्यांना योग्य परतावा मिळावा यासाठी झारखंड राज्यात 39 वनधन विकास केंद्र मंजूर करण्यात आले आहेत.
केंद्रीय आदिवासी व्यवहार राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग सरुटा यांनी लोकसभेत आज लेखी स्वरुपात ही माहिती दिली.
*****
M.Chopade/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1654078)
आगंतुक पटल : 173