भूविज्ञान मंत्रालय

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून हवामानाच्या अंदाजाबाबत साप्ताहिक व्हिडीओ


ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधून उपलब्ध

गेल्या  सप्ताहाच्या आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामान स्थिती आणि त्यासोबत हवामान अंदाज हे या व्हिडिओचे  ठळक वैशिष्ट्य असेल.

Posted On: 06 AUG 2020 3:08PM by PIB Mumbai


 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)नवीन उपक्रमास आरंभ केला असून दर गुरुवारी संध्याकाळी  गेल्या  सप्ताहातील हवामानाची ठळक वैशिष्ट्ये आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामानाचा अंदाज या व्हीडिओद्वारे उपलब्ध केला जाणार आहे.आयएमडीचे प्रख्यात वैज्ञानिक   या व्हिडीओचे वितरण करतील.ही छोटी व्हिडिओ कॅपसूल हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत असेल. गेल्या सप्ताहातील हवामानाची ठळक वैशिष्ट्ये आणि पुढील दोन सप्ताहांतील हवामानाचा अंदाज याचा या व्हिडिओ समावेश असेल.

याचा उपयोग विविध, मानवीसामाजिककृषी आणि  जलवैद्यानिक कृतीसांसाठी   होईल. विशेषतः हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन सप्ताहांचा अंदाज दिल्यामुळे देशातील विविध भागातील ओल्या आणि कोरड्या काळाबाबत माहिती मिळून शेतीच्या कामांबाबत तसेच मान्सून मुळे येणारे पूर, भूस्खलन, गडगडाट, वीज पडणे अशा विविध नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन करता येईल.

या साप्ताहिक व्हिडीओ कॅपसूल यू ट्यूब वर तसेच आय एमडीच्या संकेतस्थळावर (https://mausam.imd.gov.in/ ) उपलब्ध असतील. साप्ताहिक व्हिडीओ बरोबरच  आयएमडी, पुढील 5दिवसांच्या हवामानाची सद्यस्थिती दर्शविणारे व्हिडिओ दररोज उपलब्ध करणार आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग अत्याधुनिक साधने आणि तंत्र वापरून हवामानाच्या स्थितीचे सतत निरीक्षण करून आणि अंदाज व्यक्त करूनया महामारीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना दररोज आणि दर सप्ताहाला

हवामानाबाबत सेवा उपलब्ध करत आहे, हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. 

 

Links:

Daily: https://mausam.imd.gov.in/imd_latest/weather_video/video.php

Weekly: https://www.youtube.com/channel/UC_qxTReoq07UVARm87CuyQw

*****

U.Ujgare/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643737) Visitor Counter : 143