अर्थ मंत्रालय
'‘5.22%जीएस 2025’,ची विक्री (पुनर्जारी) साठी लिलाव , '6.19% जीएस 2034’, विक्री (पुनर्जारी) साठी लिलाव, आणि ‘7.16% जीएस 2050' विक्री (पुनर्जारी) साठी लिलाव
प्रविष्टि तिथि:
31 JUL 2020 8:24PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने (i) मूल्य आधारित लिलावाच्या माध्यमातून 12,000 कोटी रुपये (अल्प) अधिसूचित रकमेसाठी '5.22% सरकारी स्टॉक, 2025’ (ii) मूल्य आधारित लिलावाच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये (अल्प )अधिसूचित रकमेसाठी '6.19 टक्के सरकारी स्टॉक, 2034’’ (iii) मूल्य आधारित लिलावाच्या माध्यमातून 7,000 कोटी रुपये (अल्प) अधिसूचित रकमेसाठी 7.16 टक्के सरकारी स्टॉक, 2050’' च्या विक्रीची घोषणा केली आहे. केंद्र सरकारकडे वरील प्रत्येक प्रतिभूतिसाठी 2000 कोटी रुपये पर्यंत अतिरिक्त योगदान कायम ठेवण्याचा पर्याय असेल. भारतीय रिजर्व बैंक, मुंबई कार्यालय, फोर्ट, मुंबई द्वारा 07, ऑगस्ट 2020 (शुक्रवार) लिलाव आयोजित केला जाईल.
समभागांच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5 टक्के सरकारी प्रतिभूतिच्या लिलावातील बिगर स्पर्धात्मक बोली सुविधा योजनेनुसार पात्र व्यक्ती आणि संस्थाना वितरित केले जाईल.
लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक बोली भारतीय रिजर्व बँकेच्या कोर बैंकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणाली वर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात 07,ऑगस्ट 2020 रोजी सादर करण्यात याव्या. बिगर-स्पर्धात्मक बोली सकाळी 10.30 ते 11.00 दरम्यान आणि स्पर्धात्मक बोली सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान सादर करण्यात याव्यात.
लिलावाचे निकाल 07 ऑगस्ट 2020 (शुक्रवार) रोजी घोषित केले जातील आणि यशस्वी बोलीदारांकडून 10,ऑगस्ट 2020 (सोमवार ) भरणा केला जाईल.
हे समभाग भारतीय रिजर्व बैंक द्वारा वेळोवेळी सुधारित परिपत्रक क्र आरबीआय /2018-19/25, दिनांक 24 जुलै 2018, नुसार जारी “केन्द्र सरकार च्या प्रतिभूतिमध्ये कधी जारी व्यवहार” संबंधी दिशा-निर्देशानुसार “कधी जारी ”व्यवहारांसाठी पात्र असतील.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1642688)
आगंतुक पटल : 185