श्रम आणि रोजगार मंत्रालय
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील बेरोजगारांना प्रशिक्षण : संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
Posted On:
30 JUL 2020 6:01PM by PIB Mumbai
नागपूर, 30 जुलै 2020
श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकारच्या अखत्यारितील रोजगार व प्रशिक्षण महासंचालनालयाच्या नागपूर येथील कार्यालयाने, राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्राद्वारे (नॅशनल करीअर सर्विस सेंटर) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीमधील बेरोजगार युवक/युवतींना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याकरिता संस्थाकडून प्रस्ताव मागविले आहेत.
12 वी किंवा त्यापेक्षा अधिक वर्ग उत्तीर्ण असणार्या युवक/युवतींना टंकलेखन, लघुलिपी (इंग्रजी),सामान्यज्ञान, इंग्रजी भाषेचे ज्ञान तसेच संगणकाचे संचालन इत्यादींचे प्रशिक्षण देणार्या व महासंचनालयाने आखून दिलेल्या नियमानुसार पात्र ठरणार्या संस्थाकडून हे प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा अवधी हा 11 महिन्यांचा असून त्याची सुरुवात 1 सप्टेंबर 2020 पासून सुरु होण्याची शक्यता आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संचालनासाठी इच्छुक असणार्या संस्थानी अधिक माहितीसाठी व अर्जासाठी रोजगार व प्रशिक्षण महासंचनालयाच्या प्रशासकीय भवन क्रमांक-1, पाचवा मजला, सिव्हिल लाइन्स, नागपूर-440001 येथील कार्यालयात 10 ऑगस्ट 2020 पूर्वी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्र, नागपूरचे उपक्षेत्रीय रोजगार अधिकारी, पी. एस. पाचपोर यांनी केले आहे.
* * *
S.Rai/D.Wankhede/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642382)
Visitor Counter : 112