कृषी मंत्रालय

कृषी सुधारणांपश्चात शेतकऱ्यांना कृषी उत्पादनांच्या किफायतशीर मोबदल्याची रक्कम विनाअडथळा व त्वरित मिळणार - श्री नरेंद्र सिंग तोमर


दातागंज, बदायूँ येथे कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन, शेतीच्या प्रगतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची असल्याबाबत श्री तोमर यांचा पुनरुच्चार

Posted On: 07 JUL 2020 8:16PM by PIB Mumbai

 

केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांचा किफायदशीर मोबदला मिळावा यासाठी सरकार संभाव्य उपाययोजना करीत आहे. उत्तरप्रदेश येथे दातागंज, बदायूँ येथे  कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे  करताना  तोमर बोलत होते.ते पुढे म्हणाले की, दोन नवीन अध्यादेशांच्या अंमलबजावणीसह आणि कृषी क्षेत्रातील इतर कायदेशीर सुधारणांमुळे, शेतकऱ्यांना आता त्यांची उत्पादने देशभरात कोणत्याही ठिकाणी किफायतशीर किंमतीमध्ये विकू शकतात आणि त्यांच्यावरील सर्व निर्बंध हटविण्यात आले आहेत. किंमती आणि शेती सेवा अध्यादेश 2020 विषयावरील शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) करारामुळे कृषी उत्पन्न खरेदीसंदर्भात व्यापाऱ्यांशी झालेल्या कराराबरोबरच आता शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन खर्च परत मिळण्याची हमी देण्यात येईल, याची खात्री दिली जाईल.

केंद्रिय कृषीमंत्री म्हणाले की, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली, कृषी आणि अन्य क्षेत्रांमधील दरी कमी करण्यासाठी दुवा सांधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देश आता केवळ स्वावलंबीच नाही तर अन्नधान्य उत्पादनामध्येही आघाडीवर आहे. देशात 86 टक्के लहान आणि सीमान्त शेतकरी आहेत या  सर्वांनाच शासकीय योजना, कार्यक्रम आणि सुविधा उपलब्ध असायला हव्यात. याची खात्री देण्यामध्ये केव्हीके आणि शास्त्रज्ञ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. शेतकऱ्यांनी मातीच्या दर्जाच्या चाचणीकडे लक्ष द्यावे, जास्त कीटकनाशकांचा वापर करणे टाळावे, सिंचनामध्ये पाण्याची बचत केली जावी आणि त्यांचे पीक उत्पादन वाढावे यासाठी केव्हीकेच्या महत्त्वाच्या भूमिकेवर मंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले की, क्लस्टर शेती वाढविण्यात आणि स्थानिक वातावरण अनुकूल असलेल्या पिकांच्या विकासासाठी केव्हीकेची देखील महत्त्वाची भूमिका आहे.

श्री तोमर म्हणाले की, उत्तर प्रदेशामध्ये 86 कृषी विज्ञान केंद्रे आहेत, जी उत्तम काम करीत आहेत. राज्यात आणखी 20 नवीन केंद्रे सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे, त्यापैकी 17 आधीपासूनच कार्यरत आहेत. उरलेली आणखी तीन प्रयागराज, रायबरेली आणि आझमगड येथील केंद्र लवकरच सुरू होतील. अन्य केंद्र मोरादाबाद येथे प्रस्तावित आहे.

उत्तरप्रदेशचे केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री कैलाश चौधरी आणि आमदार, आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, आयएआरआयचे संचालक डॉ. ए. के. सिंह, सरदार पटेल कृषी विद्यापीठ , मेरठ येथील कुलुगुरू डॉ. आर. के. मित्तल आणि अन्न अधिकारी आणि वैज्ञानिक या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित होते. देशभरात 720 केव्हीके आहेत आणि 151 स्मार्ट खेडी आहेत, जे वेगवेगळ्या परिस्थितीत तांत्रिक मॉडेल सादर करतात. कृषी विज्ञान केंद्र हे 15 लाख शेतकरी आणि युवकांना दरवर्षी प्रशिक्षण देतात.

***.

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637064) Visitor Counter : 191


Read this release in: English