अर्थ मंत्रालय
जीएसटीआर-3 बीसाठी विलंब शुल्क ₹ 500
Posted On:
03 JUL 2020 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 3 जुलै 2020
जीएसटी करदात्यांना मोठा दिलासा म्हणून सरकारने फॉर्म जीएसटीआर -3 बीसाठी जास्तीत जास्त ₹ 500 विलंब शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुलै 2017 ते जुलै 2020 च्या कर कालावधीसाठी प्रति रिटर्न ₹ 500 विलंब शुल्क घेतले जाईल. परंतु अशा जीएसटीआर-3 बी रिटर्न्स 30 सप्टेंबर 2020 पूर्वी भरण्याची अट असेल.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) नमूद केले आहे की कर अधिसूचित नसल्यास विलंब शुल्क घेतले जाणार नाही आणि जर कर देय असेल तर जास्तीत जास्त विलंब शुल्क ₹ 500 प्रति परतावा, 30 सप्टेंबर 2020 पर्यंत भरलेल्या अशा जीएसटीआर -3 बी रिटर्न्सवर लागू असेल.
सीबीआयसीने म्हटले आहे की फेब्रुवारी 2020 ते एप्रिल 2020 या कालावधीसाठी देण्यात आलेल्या सवलतीनंतर आणि जुलै 2017 ते जानेवारी, 2020 याकाळातील लंबित परताव्यांच्या निपटाऱ्याबाबत सूट दिल्यानंतर मे 2020 ते जुलै 2020 या कालावधीत कर आकारणीसाठी विलंब शुल्क माफीबाबत विविध निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेच, एकसमान विलंब शुल्क आकारणी सोपी आणि स्वयंचलित सामान्य पोर्टलवर लागू करणे सोपे आहे. म्हणून सप्टेंबर 2020 आधी परतावा दाखल केल्यास विलंब शुल्क ₹ 500 ठरवण्यात आले आहे.
* * *
R.Tidke/M.Chopade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636222)
Visitor Counter : 129