माहिती आणि प्रसारण मंत्रालय

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाने राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कोविड -19 : मिथक आणि वास्तव यावर  वेबिनारचे केले आयोजन


सावधगिरी बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, आशेचा प्रसार करा, आरोग्यसेवेतील योद्धे आणि एकमेकांना सहाय्य करा : डॉक्टर दिनानिमित्त डॉक्टरांचा संदेश

Posted On: 01 JUL 2020 7:00PM by PIB Mumbai

 

अजिंक्य वैद्यकीय योद्धे अदृश्य विषाणूवर विजय मिळवणार आहेत.”  पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), चा पश्चिम विभाग आणि रीजनल आउटरीच ब्यूरो, महाराष्ट्र आणि गोवा विभाग यांनी आयोजित केलेल्या  कोविड -19 : मिथक आणि वास्तव या विषयावरील  राष्ट्रीय डॉक्टर दिन वेबिनारची सुरुवात या सकारात्मक संदेशाने झाली. मनीष देसाई, महासंचालक, पश्चिम विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी शब्दांचे  स्मरण करून दिले.

कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य बजावत असलेल्या दोन डॉक्टरांनी  वेबिनारला संबोधित करताना या आजाराच्या विविध पैलूंबाबत माहिती दिली. यामध्ये मिथक आणि वास्तव  तसेच विषाणू विरोधात लढण्यासाठी आणि महामारीदरम्यान स्वत: ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोकांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आजाराशी संबंधित माहितीचा समावेश होता. पुणे रुग्णालयातील सल्लागार आणि  इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. ईश्वर झंवर आणि मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या  मानसोपचार विभागाच्या प्रमुख आणि कोविड संबंधी एचआर आणि लॉजिस्टिक प्रभारी डॉ. हेनल शाह यांनी वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांशी  संवाद साधला. या वेबिनारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध विभागांचे सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, यात पत्र सूचना कार्यालयरीजनल आउटरीच ब्यूरो, आकाशवाणी, दूरदर्शन आणि फिल्म्स डिव्हिजन यांचा समावेश होता.

 

कोविड -19  विषाणू हा “सुपर स्प्रेडर” आहे ज्याबद्दल “आपण दररोज शिकत आहोत”. श्वासोच्छवासाच्या थेंबाद्वारे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यत पसरतो आणि आजपर्यंत त्यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही आणि आतापर्यंत केवळ सहायक उपचारच देण्यात येत असल्याचे डॉ. झंवर यांनी स्पष्ट केले . त्यांनी इशारा दिला की, “लस आणि औषध निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत असा विचार करून आपण आत्मसंतुष्ट राहू नये .  मास्कचा वापर , 6 फूट अंतर राखणे , हात धुणे इत्यादींबद्दल सरकार आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.  विषाणूशी संबंधित काही समजही त्यांनी खोडून काढले.

डॉ. झंवर यांनी या संबंधी वास्तव स्पष्ट केले. जसे साबण आणि पाण्याने हात धुणे किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरचा वापर याला ब्लो ड्रायिंग  किंवा अतिनील निर्जंतुकीकरण दिवे हा पर्याय नाही . ते म्हणाले की चीनकडून पॅकेज मिळाल्याने  विषाणूचा संसर्ग नक्कीच होऊ शकत नाही आणि न्यूमोनियाविरूद्ध लस कोरोना विषाणूला प्रतिबंध करू शकत नाही. घरात विषाणू पसरवणाऱ्या पाळीव प्राण्यांबद्दल ते म्हणाले, मांजरी किंवा कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्यांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही, मात्र साल्मोनेला किंवा ई कोली सारखे जीवाणू रोखण्यासाठी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर साबणाने  हात धुवावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आहारात लसणीचा वापर, मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ धुणे किंवा तिळाचे तेल लावणे हे देखील विषाणूला  दूर ठेवण्याचे खात्रीलायक उपाय नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले.

सार्स-सीओव्ही २ विरुद्ध लढाईतील प्रगतीबद्दल बोलताना डॉ. झंवर यांनी आशावादी स्वरात मत व्यक्त केले की मानवजातीने यापूर्वी गोवर, कांजिण्या  पोलिओ इत्यादी घातक विषाणूंवर मात केली आहे. आणि म्हणूनच कोरोना विषाणू वर देखील  लवकरच औषध सापडेल.  डॉ. झंवर यांनी केलेलं सादरीकरण येथे पाहता येईल.

डॉ. हेनल शाह म्हणाल्या , "सोशल मीडिया भीती विषाणूपेक्षा वेगाने  प्रवास करते". महामारी  सुरू झाल्यापासून चुकीची माहिती आणि सनसनाटी बातम्यांविषयी बोलताना डॉ. शाह म्हणाले, आरोग्य संप्रेषणात माध्यमांची भूमिका चुकीची माहिती रोखणे आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रसिद्ध करणे  ही आहे.  त्या म्हणाल्या कि  वार्तांकनाची भाषा भीती, लाज, अपराधीपणाची भावना निर्माण करणारी असू  नये. विषाणूच्या प्रसाराची भीती त्याबरोबर कलंक घेऊन येते ज्यामुळे लोक त्यांची लक्षणे लपवतात  आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे टाळतात.  अवास्तव माहितीविरोधात लढा देण्यासाठी माध्यम आणि संप्रेषणाच्या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या कीकाय केले पाहिजे याबद्दल योग्य ज्ञान देऊन त्यांनी लोकांना सक्षम बनविणे आवश्यक आहे. प्रकाशित किंवा प्रसारित केलेल्या माहितीचे समर्थन करण्याबाबत  त्या म्हणाल्या, “आपण सनसनाटी  काय  आणि उपयुक्त काय आहे यात फरक करायला हवा”.

 कोविड रुग्णालयात  काम करण्याचा  आणि कोविड ड्युटीवरील डॉक्टरांचे अनुभव सांगताना डॉ. शाह म्हणाल्या ,  “ महामारीसाठी कुणीही सज्ज नव्हते. आपण सर्वानी वेगाने बदल केले.  ” आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये कमी अवधीतच अनेक  बदल घडून आले. डॉ. शाह संलग्न असलेल्या नायर रुग्णालयाचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या कि  पूर्वी इतके ऑक्सिजन बेड्स नव्हते.  आता कोविड -19  वर उपचार घेत असलेल्या  1043 रुग्णांना ऑक्सिजनचा आधार देण्यात येत आहे. डॉक्टरांविषयी बोलताना त्या म्हणाल्या कि  वेगवेगळ्या शाखांमधील डॉक्टर आता कोविड ड्यूटीवर आहेत, महामारीवर उपचार करण्याचे  प्रशिक्षण घेतले नसले तरी  ते सर्व एका उद्देशाने कर्तव्य बजावत आहेत.  "सर्व डॉक्टर त्यांच्या विशिष्ट क्षेत्राबाहेर जाऊन  काम करत आहेत ज्यामुळे त्यांच्यावरील तणावही वाढत आहे.

डॉक्टरांना भेडसावणारी चिंता आणि भीतींबद्दल बोलताना डॉ. शाह म्हणाल्या की, ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीने चिंतीत आहेत. कोरोना विषाणूविरोधातील या युद्धामध्ये डॉक्टरांसह त्यांचे  कुटुंबिय देखील ओढले  गेले आहेत. तसेच एक अनिश्चितता कायम आहे कारण हा एक नवीन विषाणू  आहे ज्यावर आतापर्यंत कोणतेही  निश्चित बरे करण्याचे औषध नाही , जे त्यांच्या चिंतेत भर घालत आहे. पाळ्यांमध्ये काम केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन  पुन्हा ताण येतो. डॉक्टरांनी स्वतःला नवीन उपचार प्रोटोकॉल, संशोधन, जगभरातील आणि स्थानिक पातळीवरील  सर्वोत्कृष्ट पद्धती याबाबत स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. निवासी डॉक्टरांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत  आणि त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे कारण कोविड ड्युटीवर असल्यामुळे त्यांना तयारीसाठी कमी वेळ मिळत आहे. डॉ. शाह म्हणाले, की एवढे सगळे करूनही त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे, जे मनोबल ढासळण्यास कारणीभूत ठरू शकते.

 

डॉक्टरांशी संलग्न असलेल्या कलंकांबद्दल बोलताना डॉ. शाह म्हणाल्या कि समाज हिंसाचाराने कलंकाला प्रतिसाद देतो. आणि तरीही  त्यांचे काही शेजारी अशा अनिश्चित काळामध्ये नेहमीच त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करत असतात.

त्यांच्या काही सहकारी डॉक्टराना विषाणूची लागण झाली , परंतु बरे झाल्यावर ते कर्तव्यावर परत आले, अशी माहिती डॉ. शाह यांनी दिली.

वैद्यकीय समुदायाच्या अपेक्षांबद्दल डॉ. शाह म्हणाल्या  “आम्हाला आशा आहे की कोविड -19 नंतरच्या काळात आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि आरोग्य व्यावसायिकांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल, जेणेकरून भविष्यात अशा आजारांना  सामोरे जाण्यासाठी आपण सज्ज असू .” . डॉ. शाह यांनी केलेले  सादरीकरण येथे उपलब्ध आहे.

सहा मिनिटे चालण्याच्या चाचणीच्या महत्वाबाबत प्रश्नाला उत्तर देताना डॉ. झंवर म्हणाले, केवळ तीव्रतेच्या आधारे  रुग्णांचे वर्गीकरण करणे यासाठी ही  चाचणी आहे आणि आरटी-पीसीआर चाचणीची जागा ती घेऊ शकत नाही.

अनलॉक २ टप्प्यात आरोग्य विषयक माहिती कशी दिली जावी  या संदर्भात डॉ. शाह म्हणाल्या की, आता कोरोनाविरूद्धचे युद्ध आरोग्य व्यावसायिकांच्या हातातून समाजाकडे  गेले आहे. म्हणूनच, सरकार आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे ही आता समाजाची जबाबदारी आहे.जी आता संबंधित माहितीचा प्रमुख आधार बनली पाहिजे.

डॉ. शाह यांनी असेही मत मांडले की, पुरावे-आधारित संवादाबरोबरच माध्यम आणि संप्रेषणाने आशा आणि आशावादाची भावना प्रतिबिंबित केली पाहिजे.

वृद्ध लोकांवर कोविड -19 चा मानसिक परिणामाबाबत  डॉ. शाह म्हणाल्या कि  वृद्धांना सोशल मीडियाद्वारे संपर्कात राहण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याविषयी डॉ. झंवर म्हणाले, रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे घटक असणे चांगले आहे, परंतु आपण कोविड -19 विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून याचा गोंधळ घालू नये , मात्र मास्कचा वापर , हात धुणे, शारीरिक अंतर राखणे यासारखे उपाय आवश्यक आहेत.

आपल्या उद्घाटनपर  भाषणात महासंचालकांनी आपल्या देशातील प्रसिद्ध डॉक्टर आनंदीबाई जोशी, द्वारकानाथ कोटणीस, बिधानचंद्र रॉय यांचे स्मरण केले मानवजातीसाठी त्यांनी केलेल्या उदात्त सेवेबद्दल लोक आजही त्यांचा आदर करतात. डॉक्टरांना आदरांजली वाहताना  ते म्हणाले कीआपण आपल्या केंद्रस्थानी आहोत कारण आपले डॉक्टर आणि आरोग्यसेवक  कोरोना योद्धा आहेत.  "जेव्हा जग कोविड महामारीचा सामना करत असताना  कोरोना विषाणूविरोधात दीर्घकाळ चाललेल्या लढाईत हे डॉक्टर आघाडीवर लढणारे  कोरोना योद्धा आहेत." केंद्र सरकारच्या विषाणू  विरूद्ध लढा देण्याच्या सक्रिय-दृष्टिकोनाबद्दल बोलताना ते म्हणाले: “केंद्र सरकार  राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करत आहे. राज्याच्या यशोगाथा केंद्रातर्फे इतर राज्यांबरोबर सामायिक केल्या जात आहेत, जेणेकरून यशोगाथा पुन्हा तयार होऊ शकतील. कोविड -19 विरूद्धच्या लढ्याला एकात्मिक रणनीती वापरुन प्रतिसाद दिला गेला. आज, धारावी एक यशस्वी मॉडेल बनले आहे ज्याचा अभ्यास देशभरात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही केला जात आहे. उदाहरणार्थ ब्राझीलला साओ पाओलोमध्ये यशाची पुनरावृत्ती कशी करता येईल हे जाणून घेण्यात रस आहे. ” आपल्या ज्ञानामधील तफावत कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक संप्रेषणात अधिक सहानुभूतीसाठी पुरावा-आधारित संवादाचे महत्त्व देखील महासंचालकांनी अधोरेखित केले.

आरओबी पुणे चे संचालक संतोष अजमेरा यांनी आभार मानले. त्यांनी  कोविड-19.विरोधातील लढाई जिंकण्यात जनसंवादाचे महत्त्व अधोरेखित  केले.

 

R.Tidke/M.Chopade/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635719) Visitor Counter : 404


Read this release in: English , Gujarati