संरक्षण मंत्रालय
मालदिवमधल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी 'समुद्रसेतू' मोहिमेमध्ये 'आयएनएस ऐरावत' माले बंदरामध्ये दाखल
Posted On:
21 JUN 2020 11:17PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या 'ऐरावत' जहाजाने आज मालदिवमधल्या माले बंदरामध्ये प्रवेश केला. परदेशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी भारत सरकारने 'वंदे भारत' मोहिमेची आखणी केली आहे. या अंतर्गत 'समुद्र सेतू' अभियान कार्यरत आहे.
भारतीय नौदलाच्या 'ऐरावत' जाहजातून 198 भारतीयांना मालेमधून आणण्याची तयारी पूर्ण झाली आहे. तामिळनाडूतील तूतिकोरीन बंदरामध्ये हे जहाज येणार आहे. 'समुद्रसेतू' अंतर्गत भारतीयांना परत आणण्याच्या उद्देशाने ही पाचवी फेरी करण्यासाठी माले येथे हे जहाज गेले आहे. एकट्या मालदिवमधून आत्तापर्यंत 2386 भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. त्यापैकी 195 प्रवासी तामिळनाडूचे आहेत, तर उर्वरित पाँडिचेरीचे आहेत.
या सर्व प्रवाशांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया तसेच वैद्यकीय तपासणी, त्यांच्या सामानाचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच त्यांना जहाजावर प्रवेश देण्यात येत आहे. कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी शारीरिक अंतर पाळण्याच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीही संपूर्ण प्रक्रिया पार पाडताना केली जात आहे. तसेच जहाजावरील कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राखणे साईचे जावे, यासाठी जहाजावर प्रत्येक कक्षामध्ये सीमांकन करण्यात आले आहे.
*****
S.Pophale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633311)
Visitor Counter : 214