संरक्षण मंत्रालय

समुद्रसेतू अभियाना अंतर्गत आयएनएस शार्दुलद्वारे 233 भारतीय नागरिकांचे इराणमधून पुनरागमन

Posted On: 11 JUN 2020 11:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2020


समुद्रसेतू अभियानासाठी तैनात असलेले आयएनएस शार्दुल इराणच्या बंदर अब्बास बंदरातून 233 भारतीय नागरिकांना घेऊन पोरबंदर बंदरात दाखल झाले.

यावेळी भारतीय नौदल, राज्य अधिकारी आणि पोलिसांचे कर्मचारी उपस्थित होते. बंदरात स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन, रुग्णवाहिकांची उपलब्धता आणि बसगाड्या यासह सर्व व्यवस्था तैनात होती.

इराणमधून परत आणलेल्या भारतीय नागरिकांना आयएनएस शार्दुलमधून खाली उतरविण्यात आल्यावर जेट्टीवर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आणि त्यानंतर सीमाशुल्क प्रक्रिया आणि अन्य औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. त्यानंतर हे भारतीय प्रवासी विलगीकरण कक्षात जाण्यासाठी त्यांना नियुक्त केलेल्या बसमध्ये चढले. या प्रवाशांचा जिल्हावार तपशील आधीपासूनच प्रशासनाकडे पाठविला गेला होता.

परदेशी किना-यावरुन भारतीय नागरिकांची परतीची सोय करण्याच्या भारताच्या राष्ट्रीय प्रयत्नात समुद्र सेतू अभियान हे भारतीय नौदलाचे योगदान आहे. आत्तापर्यंत जलाश्व, मगर आणि शार्दूल या भारतीय नौदलाच्या जहाजातून मालदीवमधून (2188), श्रीलंकेतून (686) आणि इराणमधून (233) अशा एकूण 3107 भारतीयांना परत आणण्यात आले आहे.


* * *

B.Gokhale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631090) Visitor Counter : 114


Read this release in: English , Urdu , Bengali