संरक्षण मंत्रालय
रीअर ॲडमिरल अतुल आनंद (विशिष्ट सेवा मेडल) यांनी पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे डेप्युटी कमांडंट आणि प्रमुख प्रशिक्षक म्हणून पदभार स्विकारला
Posted On:
08 JUN 2020 10:30PM by PIB Mumbai
पुणे, 8 जून 2020
रिअर ॲडमिरल, अतुल आनंद यांची 1988 साली भारतीय नौसेनेच्या एक्झिक्यूटिव्ह शाखेत नेमणूक झाली. नेव्हीगेशन आणि दिशादर्शन क्षेत्रातील विशेषज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे.
रिअर ॲडमिरल आनंद हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (71 बॅचचे) माजी विद्यार्थी असून डिफेन्स सर्व्हीसेस कमांड आणि स्टाफ कॉलेज ,बांगलादेश आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालय येथेही त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे.यूएसएमधल्या हवाई येथील प्रतिष्ठित आशिया पॅसिफीक सेंटर फॉर सिक्युरीटी स्टडीज येथून प्रगत संरक्षण सहकार्य प्रशिक्षणही घेतले आहे. त्यांनी टॉरपेडो रिकव्हरी व्हेसल A72, क्षेपणास्त्र नौका आयएनएस चातक, कॉरव्हेट आयएनएस खुक्री आणि डिस्ट्रॉयर आयएनएसमुंबई यांचे यशस्वी नेतृत्वही केले आहे. आयएनएस चातकला युनिटचे प्रशस्तीपत्र तर आयएनएस मुंबई हे पश्चिम विभागाच्या ताफ्यातील सर्वोत्तम जहाज म्हणून निवडले गेले होते.त्यांनी सी हॅरिअर स्क्वॅड्रन आयएनएस 300 साठी दिशादर्शक अधिकारी तर डिस्ट्रायर आयएनएस दिल्लीसाठी कार्य प्रबंधक म्हणून देखील सेवा बजावली आहे.त्यांनी सहाय्यक संचालक कार्यालयीन निवड, संरक्षण सेवा स्टाफ कॉलेज निदेशक वेलिंग्टन, नेव्हल इंटेलिजन्स ऑपरेशन्स संचालक, प्रमुख संचालक नेव्हल ऑपरेशन्स, आदी महत्वपूर्ण कार्यालयीन पदेही भूषविली आहेत. या आधी ते संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) नवी दिल्लीतील एकात्मिक मुख्यालयाचे (विदेश सहकार्य आणि इंटेलीजन्स ) सहाय्यक प्रमुख म्हणून कार्यरत होते.
R.Tidke/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1630350)
Visitor Counter : 119