PIB Headquarters

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी वापरता येणारा रोबो ठाण्यामध्ये तयार


कोरोना पेशंटच्या उपचारासाठी आघाडीवर असणाऱ्या आपल्या वॉर्ड बॉईज आणि परिचारिकांसाठी हा रोबो बनवण्याची माझी इच्छा होती: प्रतिक  तिरोडकर

Posted On: 07 JUN 2020 3:35PM by PIB Mumbai

 

वॉर्ड बॉईज, परिचारिका हे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आघाडीवर असणारे आपल्या समाजातील कोरोना योद्धे आहेत आणि रुग्णांसोबत त्यांना सर्वात जास्त काळ व्यतीत करावा लागतो, त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग मध्ये पदवी घेतलेल्या प्रतीक तिरोडकरने कोरो रोबोट ची निर्मिती केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया च्या हाकेने प्रतीक प्रेरित झाला होता.

कोरो-बॉट नर्सेस आणि बोर्ड बॉईज यांच्या संपर्काची गरज नाहीशी करतो. तो रुग्णांना अन्नपाणी आणि औषधे पुरवण्याचे काम करतो कॅमेर्‍याच्या मदतीने तो रुग्णांशी संवाद साधू शकतो

यात एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील आहे. तसेच त्यात सॅनिटायझर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर सहा ते आठ तास तो कार्यरत राहील. इंटरनेटच्या माध्यमातून कार्यान्वित केला जाणार असल्याने त्याला अंतराचे बंधन नाही. प्रतिकने तयार केलेला आणि प्रत्यक्षात वापरात आलेला हा पहिलाच रोबो आहे. अन्नपदार्थ, औषधे, फळे ठेवण्यासाठी ट्रेची रचना यामध्ये करण्यात आली आहे. साठवणुकीची व्यवस्थाही आहे.

पाणी, औषधे, अन्न देणाऱ्या ट्रेमध्ये सेन्सर्स लावण्यात आले असून ते स्वयंचलितपणे हाताच्या हालचालीवर काम करतात यातून सुलभतेबरोबरच वस्तूंचा अपव्यय टळतो.

या रोबो मध्ये एलईडी लाईट च्या मदतीने प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे त्याचे रात्री संचालन करणेदेखील शक्य होते यावर एक छोटेसे संगणकवजा उपकरणही लावण्यात आले आहे ज्यातून छोटी-मोठी कामे तसेच मनोरंजनाची सोय होते

लॉकडाउनच्या काळात रोबो बनवण्यासाठी ची उपकरणे मिळणे अवघड झाले असताना प्रतीकने खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या मदतीने हा रोबो आकारास आणला त्यासाठी त्याला त्याच्या तीन ते चार सहकाऱ्यांची मदत झाली. रोबोट चे पार्ट बनवणारी दुकाने बंद असल्याने त्यांनी स्वतः ते पार्ट बनवले

पंधरा ते वीस दिवसात बनलेला हा प्रायोगिक रोबो सध्या कल्याण येथील होली क्रॉस रुग्णालयात सेवा देतो आहे. प्रतीकला विश्वास आहे की तो दर आठवड्याला दोन ते तीन रोबो बनवू शकतो. या रोगाच्या संचलनासाठी प्रतीक आणि त्याच्या टीमने एक स्पेशल अॅप  बनवले आहे जे इंटरनेटचा वापर करून या रोबोचे दूर ठिकाणावरून संचालन देखील शक्य बनवते. प्रतीक सारख्या उत्साही तरुणांच्या प्रयत्नांमुळे आत्मनिर्भर बनवण्याचे भारताचे स्वप्न लवकरच साकार होईल. अधिक माहितीसाही प्रतिक तिरोडकर यांना 8097141179 या नंबरवर संपर्क करता येईल.

***

R.Tidke/M.Chopade/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630041) Visitor Counter : 235


Read this release in: English , Gujarati