माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे छायाचित्रकार श्रीधर पाटील यांचे निधन

Posted On: 01 JUN 2020 1:41PM by PIB Mumbai

मुंबई, 1 जून 2020

 

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालय (पीआयबी), मुंबईचे छायाचित्रकार, श्रीधर पाटील यांचं आज सकाळी निधन झालं. ते 55 वर्षांचे होते. पाटील गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोविड19 ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.  त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

पीआयबी मुंबई कार्यालयातील अतिशय कष्टाळू, प्रामाणिक आणि नम्र कर्मचारी अशी पाटील यांची ख्याती होती. पीआयबी मुंबई कार्यालयाच्या वतीने त्यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.  "पाटील हे आमच्या फोटो विभागाचा एक महत्त्वपूर्ण घटक होते आणि सदैव आपल्याला नेमून दिलेले काम करण्यास ते तत्पर असत. त्यांनी या कार्यालयासाठी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील", अशी शोकभावना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांनी पाटील यांच्या कुटुंबियांना पाठवलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

मुंबईत आयोजित केंद्रीय मंत्री आणि इतर वरिष्ठ मंत्री यांच्या कार्यक्रमांना छायाचित्रकार म्हणून दिवंगत श्रीधर पाटील नियमितपणे उपस्थित असत.

पीआयबीचे मुख्य महासंचालक कुलदीप सिंग धतवालिया यांनी नवी दिल्ली येथून आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. मुंबईच्या वृत्तपत्र समूहातील छायाचित्र पत्रकार तसंच प्रसारमध्यमातील प्रतिनिधींनीही पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

 

R.Tidke/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1628281) Visitor Counter : 279


Read this release in: English