पंतप्रधान कार्यालय

ओदिशाची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधानांचे वक्तव्य

Posted On: 22 MAY 2020 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

                                 

एकीकडे सर्व जग कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या समस्येशी झगडत आहे,आयुष्य वाचवण्यासाठी जग लढा देत आहे.अशा संकटाच्या काळात हिंदुस्तान मधे केंद्र सरकार असो,राज्य सरकार असो,सर्व विभाग,एक प्रकारे सर्व नागरिक गेले दोन अडीच महिने कोरोना विषाणूशी लढा देत आहेत.

अशा काळात चक्रीवादळाचे इतके मोठे संकट आणि तेही महा चक्रीवादळ, चिंतेची मोठी बाब होती. बंगाल मधून जाता-जाता ओदीशाचेही हे चक्रीवादळ किती नुकसान करेल हा चिंतेचा विषय होता. इथे ज्या प्रकारे व्यवस्था संस्थागत करण्यात आली आहे, गावातल्या नागरिकांना अशा संकट काळात काय करायचे याबाबत व्यवस्थित माहिती असल्यामुळे आयुष्य वाचवण्यामधे इथे मोठे यश मिळाले आहे.यासाठी ओदिशाचे नागरिक,प्रशासन आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि संपूर्ण चमू अभिनंदनाला पात्र आहे.

मात्र एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा संपत्तीचे नुकसान तर होतेच. पश्चिम बंगालच्या तुलनेत ओदिशाचे इतके नुकसान झाले नाही, मात्र जाता जाता थोडा फटका देऊन जाणारे अशा प्रकारचे हे संकट.  म्हणूनच घरे,कृषी,उर्जा,दूरसंवाद, पायाभूत क्षेत्रात जे नुकसान झाले आहे त्याचा मी आज तपशीलवार आढावा घेतला. राज्य सरकारनेही विस्ताराने सर्व बाबी समोर मांडल्या.

इथले सरकार लवकरच त्याचा आढावा घेऊन त्याचा अहवाल भारत सरकारला सादर करेल. भारत सरकारचे पथक तात्काळ इथे येऊन पूर्ण परिस्थितीचा आढावा घेईल. मदत, पुनर्स्थापना, पुनर्वसन या सर्व बाबींना प्राधान्य देत काम सुरु ठेवण्यात येईल. 

मात्र तात्काळ आवश्यकता लक्षात घेऊन भारत सरकारकडून 500 कोटी रुपये आगाऊ व्यवस्था म्हणून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संपूर्ण सर्वेक्षणानंतर, पुनर्वसनाची संपूर्ण योजना तयार झाल्यानंतर, या संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार संपूर्ण मदत करेल तसेच विकासाच्या प्रवासात ओदिशाच्या बरोबरीने केंद्र सरकार उभे राहील.

खूप-खूप धन्यवाद.

 

 

 

* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626244) Visitor Counter : 163


Read this release in: English