गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वदेशीला प्रोत्साहन केंद्रीय सशस्त्र दलाच्या कॅन्टीन मध्ये केवळ स्वदेशी उत्पादने विकण्याचा निर्णय


कुटिरोद्योग आणि ग्रामीण उद्योगांना मोठी चालना

Posted On: 18 MAY 2020 11:07PM by PIB Mumbai

मुंबई, 18 मे 2020

 

भारताने आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पाहिले पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तूंना, उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केल्यानंतर, त्याला प्रतिसाद देत, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व निमलष्करी दलांच्या कॅन्टीन आणि दुकानांमध्ये केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री अनिवार्य केली आहे. विशेषतः कुटिरोद्योग तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. या निर्णयामुळे शेतकरी, बेरोजगार युवक आणि कुटिरोद्योग तसेच ग्रामोद्योग क्षेत्रातील अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

गृहमंत्रालयाने 15 मे रोजी यासंदर्भातला आदेश जारी करुन या निर्णयाची अंमलबजावणी 1 जून 2020 पासून केली जावी, असे सांगितले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाल्यावर केंद्रीय सशस्त्र दलाच्या कॅन्टीन आणि दुकानांमध्ये KVIC ची उत्पादने विक्रीला ठेवली जातील.

'केंद्रीय पोलीस कल्याण भांडारने 17 उत्पादनांची ऑर्डर खादी आणि ग्रामोद्योग- KVIC आयोगाला दिली आहे. आता KPKB भांडार मध्ये केवळ स्वदेशी उत्पादनांची विक्री करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. या आदेशानुसार, KPKB आवश्यक वस्तूंची मागणी खादी आणि ग्रामोद्योग कडे करावी’, असे या आदेशात म्हंटले आहे.

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी गृहमंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे देशातील कुटिरोद्योग तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रांना मोठे पाठबळ मिळेल, या क्षेत्रातील लाखो कामगारांना त्याचा लाभ होईल, असे ते म्हणाले. निमलष्करी दलातील 10 लाखापेक्षा अधिक जवान आता कुटिरोद्योग तसेच खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राचे थेट ग्राहक बनतील. तसेच, या निर्णयाचे स्वागत म्हणून KVIC देखील CAPF च्या कॅन्टीनला केवळ 3% लाभ ठेवून माल विकणार आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.

सध्या, देशात 20 प्रमुख भांडार असून त्यांची वार्षिक उलाढाल 1800 कोटी रुपये आहे. या एकूण उलाढालीत KVIC ला मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे. सध्या, KVIC ने  CAPF च्या कॅन्टीन मध्ये 17 उत्पादनांसाठी नोंदणी केली आहे. यात खादी राष्ट्रध्वज, मध, लोणची, खाद्यतेल असे खाद्यपदार्थ, उदबत्ती, पापड, आवळ्याची उत्पादने, सुती टॉवेल अशा    वस्तू आहेत. आणखी 63 वस्तूंची यादी KVIC ने CAPF च्या कॅन्टीन ला दिली असून आगामी काळात त्यांचीही ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.

 
* * *

S.Pophale/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625082) Visitor Counter : 107


Read this release in: English