संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूषविले मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेच्या आभासी कार्यकारी परिषदेचे अध्यक्षस्थान

Posted On: 08 MAY 2020 10:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8  मे 2020

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेच्या (एमपी-आयडीएसए) 165 व्या आणि पहिल्या आभासी कार्यकारी परिषदेच्या (ईसी) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर मर्यादा असूनही आपले कर्तव्य बजावल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह  यांनी एमपी-आयडीएसएचे महासंचालक, राजदूत सुजान आर चिनॉय, ईसीचे सर्व सदस्य आणि इतर तज्ज्ञ मंडळींचे अभिनंदन केले. कोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञ आणि कर्मचार्‍यांच्या हालचालींवर मर्यादा असल्या तरी त्यावर यशस्वीपणे मात करीत संस्थेने या तज्ज्ञांचे संशोधन त्यांच्या लिखाणाद्वारे आणि वेबिनारच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविल्याचे संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले. एमपी-आयडीएसए ही निर्बंधा दरम्यान पुन्हा सुरु होणाऱ्या संस्थांपैकी पहिली संस्था असून सर्व सुरक्षाविषयक आणि सुरक्षित शारीरिक अंतर नियमांचे अनुसरण करीत आहे.

संरक्षण, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधन करणारी एक प्रमुख संस्था म्हणून एमपी-आयडीएसएच्या योगदानाची प्रशंसा राजनाथ सिंह यांनी केली. वर्षानुवर्षे संस्थेने देशातील विविध राज्यांतील सशस्त्र सेना, केंद्रीय पोलिस संघटना आणि निमलष्करी दले, सरकारच्या संशोधन संस्था आणि विद्यापीठांशी व्यापक संबंध प्रस्थापित करण्यासाठी परिश्रमपूर्वक कार्य केले आहे. देश-विदेशातील विद्वानांसोबत या संस्थेचे विस्तृत आदान प्रदान असल्यामुळे विद्वानांना मुक्त वातावरणात स्पष्ट मत मांडण्याची संधी प्रदान करते. विचारांच्या अशा आदान-प्रदानामुळे धोरण ठरविताना वैकल्पिक दृष्टीकोन आणि नवीन माहिती मिळते.

एमपी-आयडीएसएच्या भावी प्रयत्नांसाठी शुभेच्छा देताना सध्याच्या अर्थव्यवस्थेतील संकटकाळात  विशेषत: संरक्षण आधुनिकीकरणासाठी लागणाऱ्या संसाधनांच्या मर्यादेवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी  नवीन कल्पना तयार करण्याच्या दृष्टीने आत्मविश्वास वाढवावा, अशी विनंती संरक्षण मंत्र्यांनी केली. दहशतवादविरोधी लढ्यात सीमेवर सज्ज असणाऱ्या आणि कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात मदत व पाठबळ देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य व बलिदानाचे कौतुक राजनाथ सिंह यांनी यावेळी केले.

आयोगाच्या बैठकीस त्याचे सदस्य संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, माजी गृहसचिव जी. के. पिल्लई आणि प्रा. एस. डी. मुनी उपस्थित होते. राजदूत स्वस्पावन सिंह, लेफ्टनंट जनरल प्रकाश मेनन (सेवानिवृत्त), व्हाईस ऍडमिरल शेखर सिन्हा (निवृत्त), एअर मार्शल व्ही.के. भाटिया (निवृत्त) आणि  गुलशन लुथ्रा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीस उपस्थित होते.

 

M.Jaitly/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1622465) Visitor Counter : 167


Read this release in: English