माहिती आणि प्रसारण मंत्रालय
शिकागोहून येणाऱ्या एअर इंडियाच्या प्रवाशांना तिप्पट विमान भाडे द्यावे लागले असल्याचा व्हायरल व्हिडिओमधील दावा बनावट
Posted On:
08 MAY 2020 2:00PM by PIB Mumbai
मुंबई, 8 मे 2020
व्हायरल व्हिडिओत दावा केला आहे की शिकागोहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील प्रवासी त्यांच्याकडून तिप्पट भाडे आकारल्यामुळे वाद घालत होते. तसेच या प्रवाशाना सामाजिक अंतरांच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बसवण्यात आले होते असा दावाही करण्यात आला आहे.
दावा केला जात असलेला हा व्हिडिओ शेजारच्या देशातील विमान कंपनीचा आहे, एअर इंडियाचा नाही असे नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

'वंदे भारत मिशन’ अंतर्गत आकारले जाणारे भाडे आणि दक्षिण पूर्व आशिया, पश्चिम आशिया, ब्रिटन आणि अमेरिका येथे अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी एअर इंडियाकडून चालवण्यात येणाऱ्या उड्डाणांच्या पहिल्या आठवड्याच्या वेळापत्रकाची घोषणा आधीच करण्यात आली आहे आणि सरकार कुणालाही जास्त शुल्क आकारणार नाही.
पीआयबी फॅक्ट चेक युनिटने संबंधित मंत्रालय किंवा विभागांशी संपर्क साधून या बातम्यांच्या सत्यतेची पडताळणी केली आहे. खोट्या बातम्यांचा धोका टाळण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही संस्थागत व्यवस्था केली आहे.
M.Jaitly/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1622102)
Visitor Counter : 161