वस्त्रोद्योग मंत्रालय
महाराष्ट्रातील 34 केंद्रांवर हमीभावानुसार कापूस खरेदी सुरु; लॉकडाऊनच्या काळात 36,500 क्विंटल कापसाच्या 6900 गासड्यांची खरेदी
महाराष्ट्रातील कापसाच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे 77.40% कापसाची 25 मार्च 2020 पर्यंत विक्री पूर्ण, CCI कडून 4995 कोटी रुपयांच्या 91.90 क्विंटल कापसाची खरेदी
खरेदी झालेल्या कापसाचे मूल्य शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरु, आतापर्यंत 4987 कोटी रूपये शेतकऱ्यांना वितरीत
Posted On:
04 MAY 2020 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 मे 2020
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकतांना अडचणी येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे, की भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायाला तयार असून राज्यात या हमीदराने कापसाची खरेदी केली जात आहे.
महाराष्ट्रात, ऑक्टोबर 2019 पासून, हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. 25 मार्च 2020 पर्यंत भारतीय कापूस महासंघाने 91.90 लाख क्विंटल म्हणजेच 18.66 लाख कापसाच्या गासड्याची खरेदी केली आहे. राज्यातील 83 केंद्रांवरुन ही खरेदी करण्यात आली असून या कापसाचे एकूण बाजारमूल्य 4995 कोटी रुपये एवढे आहे.
महाराष्ट्रात उत्पादित झालेल्या एकून कापसापैकी, २५ मार्च २०२० पर्यंत 77.40 % कापसाची खरेदी CCI आणि खाजगी व्यापाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अद्याप 22.60 % कापूस बाजारात आला नाही.
या कापसापैकी, सुमारे 40 ते 50 % कापूस, ज्याची किंमत सुमारे 2100 कोटी असेल तो, FAQ दर्जाचा असण्याची शक्यता आहे. या कापसाला चांगला बाजारभाव मिळाला नाही, तर त्याची हमीभावानुसार खरेदी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असेल.
राज्यात हमीभावानुसार खरेदी सूरु असून 34 केंद्रातून CCI च्या मार्फत कापसाची खरेदी सुरु आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात 36,500 क्विंटल म्हणजेच 6900 गासड्या कापसाचे उत्पादन झाले.
राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे या खरेदीवर नियंत्रण ठेवले जाते. सध्या कापसाच्या एकूण केंद्रांपैकी 27 केंद्रे रेड झोनमध्ये येत असून, या ठिकाणी 3 मे 2020 नंतर खरेदीप्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. उरलेल्या 22 केंद्रांवर CCI ने राज्य सरकारशी संपर्क साधला असून शेतकऱ्यांना कापूस देण्याची मागणी केली आहे. या खरेदीकडे वस्त्रोद्योग मंत्रालय दैनंदिन देखरेख ठेवून आहे. या खरेदीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी, CCI, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, सातत्याने बैठका घेऊन अडचणी सोडवल्या जात आहेत. ही खरेदीप्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी योग्य व्यवस्था करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्रालयाने, APMC बाजारालाही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
खरेदी झालेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, CCI आवश्यक ती पावले उचलत आहे. एकूण खरेदी केलेल्या 4995 कोटी रुपयांपैकी 4987 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620887)