माहिती आणि प्रसारण मंत्रालय

कोविड -19 च्या आव्हानाचा विविध आघाड्यांवर सामना करण्यासाठी माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक जनसंपर्क विभागाकडून (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश) अनेक नवीन उपक्रमांचा प्रारंभ

Posted On: 20 APR 2020 7:55PM by PIB Mumbai

 

मुंबई, 20 एप्रिल 2020

 

* कोविड -19 विषयी सृजनात्मक आणि चित्ताकर्षक डिजिटल- माध्यम- मजकुराच्या आधारे ऑनलाईन जनजागृती अभियानाचा प्रारंभ,

दुर्गम खेडी व ग्रामीण क्षेत्रांत फिरत्या श्राव्य उद्घोषणा प्रणालीद्वारे क्षेत्रस्तरीय माहिती अभियानाला सुरुवात.

* लॉकडाउनच्या काळात सरकारने केलेल्या कामांबद्दल तळागाळातील जनतेकडून अभिप्राय आणि प्रतिसाद मिळविण्यासाठी सर्वस्पर्शी मोहिमेची सुरुवात.

 

डिजिटल माध्यम जनजागृती अभियान

कोविड -19 बद्दल जनजागृती करण्यासाठी, क्षेत्रीय जनसंपर्क विभाग (ROB), माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार- च्या वतीने, या साथरोगाच्या विविध पैलूंबद्दल माहिती देणारा आणि वापरकर्त्याच्या दृष्टीने चित्ताकर्षक असा डिजिटल मजकूर तयार करण्यात येत आहे. या संदेशामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, घरीच थांबून लॉकडाउनचे काटेकोर पालन, सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती-व्यक्तींमध्ये उचित अंतर राखणे, सरकारी आदेश व सूचनांचे पालन, आरोग्यसेतू app डाउनलोड करणे, लॉकडाउनच्या काळात परवानगी असलेल्या अत्यावश्यक सेवांची सूची करणे, मानसिक व शारीरिक आरोग्याकडे लक्ष पुरविणे आणि अफवांचा प्रसार टाळणे- इत्यादींवर भर दिला जात आहे. हे सृजनात्मक संदेश, ROB च्या समाजमाध्यम अकाउंट्स वर तसेच, ROB च्या कर्मचारी व अधिकारी वर्गाकडून whatsapp वर पाठविले जात आहेत. दररोजच्या whatsapp वर आधारित संदेशवाहनातून 13,000 पेक्षा अधिक जणांपर्यंत थेट पोहोचता येत आहे.

फिरत्या श्राव्य उद्घोणांद्वारे जनजागृती अभियान

महाराष्ट्र आणि गोव्याच्या ग्रामीण भागात ROB ने तीन चाकी / ऑटो रिक्षा / टेम्पो च्या मदतीने, कोरोनाबद्दलची ध्वनिमुद्रित गाणी व संदेश ऐकवण्याची व त्याद्वारे श्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाच्या विविध प्रतिबंधात्मक उपायांवर तसेच सरकारच्या उपाययोजनांवर या संदेशांमध्ये भर दिलेला असतो.  हा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही गाणी स्थानिक भाषेत किंवा बोलीभाषेत बांधण्यात आली आहेत.

महाराष्ट्र आणि गोव्याच्या 16 कोविड बाधित जिल्ह्यांमध्ये या अभियानाचा प्रारंभ केला गेला. यामध्ये पुणे, परभणी, नाशिक, नांदेड, लातूरसोलापूर, सातारा,उस्मानाबाद कोल्हापूर,जळगाव, अमरावती, औरंगाबादबुलडाणा, अहमदनगर आणि बीड तसेच दक्षिण गोवा यांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान, 7 ते 14 एप्रिल या काळात 16 जिल्ह्यांत 23 रिक्षांनी संदेशवहन करत 7,000 किलोमीटर अंतर कापले.


 

लोकांचा अभिप्राय- जनता व सरकारमधील सेतू

महाराष्ट्र व गोव्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागांतील, विविध सरकारी योजनांच्या तळागाळातील लाभार्थ्यांकडून, त्यांचा अभिप्राय आणि प्रतिसाद मिळविण्याचे कामही ROB  ने जोमाने सुरु केले आहे. लॉकडाउनच्या काळात सुरु करण्यात आलेल्या विविध सरकारी योजनांबद्दलचा अभिप्राय सरकारला कळविला जात आहे. तात्पर्य, ROB  केवळ कोविड -19 बद्दल जनजागृतीच करत आहे असे नाही, तर जनता व सरकार यांदरम्यान सेतूचे कामही करीत आहे.   

या काळात अफवा, चुकीची माहिती आणि तिरस्कारजनक वक्तव्ये यांच्या प्रसाराला आळा घालण्यासंबंधीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार, पत्र सूचना कार्यालयात भारत सरकारचे 'फॅक्ट चेकिंग युनिट - अर्थात वस्तुस्थिती तपासणी एककस्थापन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वय साधून ROB , या एककाला सहकार्य करते.

ROB हे माहिती प्रसारण मंत्रालय, भारत सरकार चे माध्यम एकक असून, त्याचे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशासाठीचे मुख्यालय पुणे येथे आहे. राज्यात त्याची 10 क्षेत्रीय कार्यालये असून, भारत सरकारच्या विविध उपक्रमांबद्दल जनजागृती व संदेशवहनाची जबाबदारी या संस्थेकडे आहे.

 

B.Gokhale/J.Vaishampayan/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1616502) Visitor Counter : 325


Read this release in: English