उपराष्ट्रपती कार्यालय

कोणत्याही मंडळ तसेच कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असा सल्ला राज्यपाल आणि नायब राज्यपालांनी धार्मिक नेते मंडळींना द्यावा- उपराष्ट्रपतींचे आवाहन


शेतीमालाची खरेदी तसेच पिकांच्या कापणीसह इतर कृषीकामे सुलभतेने करण्‍यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत उपराष्ट्रपतींकडून चिंता व्यक्त असे कृत्य करण्यापुर्वी लोकांनी संवेदनशीलतेने विचार करावा

स्थलांतरीत कामगारांसाठी लोकांनी अन्न आणि निवारा यासाठी सढळ मदत करण्‍याचे आवाहन

Posted On: 03 APR 2020 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

देशभरामध्‍ये कोविड-19च्या विषाणूंचा प्रसार रोखण्‍यासाठी सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे.  हे लक्षात घेवून उपराष्‍ट्रपती एम. व्‍यंकय्या नायडू यांनी आज देशातल्‍या सर्व राज्यांच्या राज्यपालांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या नायब राज्यपालांना आवाहन केले आहे. त्यांनी धार्मिक नेत्यांना, अध्यात्मिक गुरूंना सरकारच्या बंदी आदेशाविरुद्ध कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम तसेच एकत्र जमण्यासारखे मेळावे किंवा सभा अशा गोष्‍टींचे आयोजन करू नये, असा  सल्ला नायडू यांनी दिला आहे.

सध्‍या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सर्वांनी आपआपल्या राज्यात, भागात पिकांची कापणी आणि इतर सर्व कृषी कामे, पिकांची साठवण सुलभतेने होत आहेत की नाही तसेच कृषिमालाची खरेदी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपती नायडू यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमवेत उपराष्‍ट्रपती एम. व्‍यंकय्या नायडू यांनी आज देशभरातले राज्यपाल आणि नायब राज्यपाल, प्रशासक यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी  आपआपल्या भागातल्या धार्मिक आणि अध्यात्मिक नेत्यांशी सर्वांनी संपर्क साधावा आणि त्यांनीच आपल्या अनुयायांना सोशल डिस्टन्सिंग काटेकोर पाळणे किती आवश्यक आहे, यासाठी मार्गदर्शन करावे. सामाजिक अंतर आणि व्यक्तिगत स्वच्छता पाळणे किती गरजेचे आहे, हे धार्मिक नेत्यांनीच आपल्या अनुयायांना सांगावे, असे आवाहन यावेळी नायडू यांनी केले.

दिल्लीजवळ अलिकडे घडलेल्या एका घटनेचा संदर्भ देवून त्यांनी असे एकत्रित येणे टाळता येणे शक्‍य होतेमात्र एकत्र जमण्‍यास बंदी असतानाही मोठ्या संख्‍येने लोक एकत्रित जमले. त्याचा देशभर मोठा, व्यापक परिणाम झाला आहे, असं नायडू, यांनी यावेळी सांगितले. ही घटना एक प्रकारे आपले डोळे उघडणारा, इशारा देणारा ‘कॉल’ आहे; हे जाणून घेवून पुढील परिणाम टाळण्‍यासाठीच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे, असं यावेळी नायडू म्‍हणाले.

काही राज्यांमध्‍ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनांविषयी चिंता व्यक्त करून नायडू यांनी या घटना दुर्दैवी आणि निंद्य असल्याचे सांगितले; कोविड-19च्या विरोधात डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी आणि इतर आघाडीवर कार्यरत असलेल्या योद्ध्‍्यांचे जीवनरक्षणाच्या भूमिकेविषयी जनतेने संवेदनशील असावे, हे जनतेला राज्यपालांनी सांगावे, असंही नायडू यावेळी म्हणाले.  अशा घटनांमुळे केवळ डॉक्टरांचेच नाही तर इतरांचेही मनोधैर्य खचण्‍याची शक्यता असते, असे उपराष्‍ट्रपती यावेळी म्हणाले.

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांमागची सत्य कारणे शोधून काढण्‍याची गरज आहे.  मात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून ही सर्व आरोग्य सेवा कामामध्‍ये व्यस्त असलेली मंडळी कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या बहुमोल कामाची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे; असंही ते म्हणाले.

सध्‍या शैक्षणिक संस्था बंद आहेत, अशा काळात मुलांना काही ऑनलाईन अभ्‍यासक्रम करता येतील का, याविषयी कोणती व्यवस्‍था करता येवू शकते, याची माहिती राज्यपाल आणि नायब राज्यपालांकडून नायडू  यांनी प्रयत्न केला.

उपराष्‍ट्रपती नायडू यांनी स्थलांतरीत कामगार, प्रवासी, या लोकांना जीवनावश्‍्यक  वस्तू आणि औषधांचा पुरवठा कसा केला जात आहेयाची माहिती जाणून घेतली. परप्रांतीय कामगारांना येत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी राज्ये आणि केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेतच, मात्र या लोकांसाठी अन्न आणि निवारा देण्‍यासाठी समाजानेही मदतीला यावे, त्यांचेही कर्तव्य असल्याचे नायडू यांनी नमूद केले.

देशभरातली जनता ‘लॉकडाउन’ च्या नियमांचे पालन करत आहे, त्‍याबद्दल त्यांनी सर्व जनतेचे कौतुक केले. स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी सामाजिक अंतर नियम काटेकोरपणे पाळावेत, असं आवाहन नायडू यांनी केलं. जनतेने नियमांचे, कायद्याचे उल्लंघन टाळावे, असंही ते म्हणाले.

माननीय राष्ट्रपती आणि माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी दिलेल्या सल्ल्यांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ञ, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआर यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

उपराष्ट्रपतींनी यावेळी 35 राज्यपाल, नायब राज्यपाल आणि प्रशासक यांनी आपआपल्या क्षेत्रामध्‍ये कोविड-19 या महामारीचा सामना करण्यासाठी कशाप्रकारे उपाय योजना केल्या आहेत, त्याचा आढावा घेतला.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1610712) Visitor Counter : 178


Read this release in: English