ग्रामीण विकास मंत्रालय
कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या पी.एम.जे.डी.वाय खात्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल 2020 मध्ये थेट रक्कम जमा होणार
बँकांच्या शाखा, बीसीज् आणि एटीएममधून खातेदारांना रक्कम काढता येईल
Posted On:
03 APR 2020 3:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020
ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत (पीएमजेडीवाय) प्रत्येक महिला खातेदारांना (बँकांनी अंतर्भूत केलेल्या खाते क्रमांकाना) एप्रिल 2020 महिन्यासाठी एक रकमी रुपये 500/- देण्यात येणार आहेत, आणि हि रक्कम संबंधित बँकांमध्ये 2 एप्रिल 2020 रोजी जमा करण्यात आले आहे.
अर्थमंत्र्यांनी 26.03.2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानंतर पीएमजेडीवाय खातेदारकांना पुढील तीन महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत रुपये 500/- देण्यात येणार आहेत.
सध्याच्या परिस्थितीत सामाजिक अंतर ठेवण्याच्या सूचनेनुसार लाभार्थ्यांनी पैसे काढण्यासाठी आर्थिक सेवा विभागाने (डीएफएस) बँकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. खातेदारांची रक्कम काढताना योग्य ते अंतरही ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
खालील रकान्यात दिलेल्या तपशीलानुसार खातेदाराच्या खातेक्रमांकाच्या शेवटच्या संख्येवर आधारित या रकमेचे वितरण करण्यात येईल.
पीएमजेडीवाय खातेदार महिलेच्या खातेक्रमांकाची शेवटची संख्या
|
लाभार्थ्यांना रक्कम वितरित होणारी तारीख
|
० किंवा 1
|
3.4.2020
|
2 किंवा 3
|
4.4.2020
|
4 किंवा 5
|
7.4.2020
|
6 किंवा 7
|
8.4.2020
|
8 किंवा 9
|
9.4.2020
|
दिनांक 09.04.2020 नंतर लाभार्थ्यांना थेट बँक शाखा किंवा बीसी केंद्रातून बँकेच्या निर्धारित कामकाजाच्या वेळेत ही रक्कम मिळू शकेल. बँकांनी देखील एसएमएसच्या माध्यमातून संबंधित खातेदारांना वरील तारखांच्या नियोजनाची माहिती द्यावी, असे बँकांना सुचविण्यात आले आहे.
या संदर्भात राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एसएलबीसी) संयोजकांनी राज्य सरकारांशी संपर्क साधून त्यांना सदर योजनेची माहिती द्यावी आणि त्यांच्याकडून बँक शाखा, बीसी केंद्र आणि एटीएम येथे योग्य सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे, अशा तातडीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच राज्यसरकारांना देखील संबंधित जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनांना या कामी बँकांना पैसे वितरित करताना योग्य ती मदत आणि सहकार्य करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँकांना देखील आपापल्या बँक शाखांना आणि अधिकाऱ्यांना आणि व्यवसाय प्रतिनिधींना संबंधित योग्य त्या सूचना देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
B.Gokhale/S.Shaikh/P.Malandkar
(Release ID: 1610656)
Visitor Counter : 347