गृह मंत्रालय
भारतात पर्यटक व्हिसा वर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल गृह मंत्रालयाने 960 विदेशींचा काळ्या यादीत केला समावेश
Posted On:
02 APR 2020 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020
भारतात पर्यटक व्हिसा वर येऊन तबलिग जमात कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या निर्देशाखाली, गृह मंत्रालयाने 960 विदेशींचा काळ्या यादीत समावेश केलाआहे.
नियम भंग करणाऱ्या या सर्व व्यक्तीविरोधात, विदेशीसाठींचा 1946 चा कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधल्या संबंधित कलमाअंतर्गत, संबंधीत राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांच्या पोलीस महासंचालकांनी आणि दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी,प्राधान्याने आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही गृह मंत्रालयाने दिले आहेत.
G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1610522)
Visitor Counter : 209