आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

1.5 कोटी हुन अधिक PPE साठी आम्ही मागणी नोंदवली आहे, पुरवठा सुरू झाला आहे- आरोग्य मंत्रालय


1 कोटी पेक्षा अधिक 95 मास्क, राज्यांना देण्यात आले आहेत- आरोग्य मंत्रालय

Posted On: 02 APR 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

गेल्या 24 तासात आणखी 328 जणांना लागण झाली असून एकूण 1965 बाधित आहेत. एकूण 50 जणांचा मृत्यू, तर गेल्या 24 तासात 12 जणांचा मृत्यू झाला. तर  151 जण COVID2019 मधून बरे झाले अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव श्री लव अगरवाल यांनी दिली.

यावेळी COVID2019 चा संसर्ग होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल App जारी करण्यात आले.

श्री अगरवाल यांनी या परिषदेत खालील माहिती दिली.

  • COVID2019 चा संसर्ग होण्याचा धोका जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून मोबाईल App जारी. ब्लुटूथ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर आधारित हे ऍप आहे.
  • सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी, लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे गृह सचिवांचे निर्देश, सर्वोच्च न्यायालयाच्या 31 मार्च 2020 च्या आदेशातही यावर भर
  • लॉकडाऊनचा भंग हा आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत दंडनीय अपराध. लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी, लॉक डाऊनच्या तरतुदींचा व्यापक प्रसार करावा – गृह मंत्रालय
  • Covid2019 संदर्भातल्या शंकांचे राज्य स्तरावर निरसन करण्यासाठी, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही, अचूक आणि विश्वसनिय माहितीसाठी अशीच यंत्रणा उभारण्याची गृह सचिवांची, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती. त्यानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत कोविड-19 बाबत सत्यता पडताळणी पथक कार्यरत
  • तबलीग जमातीच्या कार्यक्रमाशी संबंधित सुमारे 9000 लोकांना शोधून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये 1306 विदेशी नागरिक. तबलीग जमात कार्यक्रमाशी संबंधित लोकांच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू. अशा 400 व्यक्ती आढळल्या असून अतिरिक्त तपासणी सुरू आहे.  त्यातून आणखी काही व्यक्ती पॉझिटिव्ह  आढळण्याची शक्यता.
  • अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या  बातम्या रोखण्यासाठी,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिले पत्र, आरोग्य मंत्रालयाने ही तांत्रिक बाबींवर अचूक  माहिती देण्यासाठी खालील ईमेल आयडी सुरु केला technicalquery.covid19[at]gov[dot]in
  • डायलिसिस सुरू असलेल्या किडनी रुग्णांनी, खबरदारी आणि काळजी घेण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत, आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी
  • वृद्ध आणि लहान मुले यांच्यामध्ये निर्माण झालेला ताण आणि चिंता  कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्वे जारी- संयुक्त सचिव
  • लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 352 रेल्वे डब्यातून 9.86 लाख मेट्रिक टन अन्नधान्य वाहतूक केली आहे.
  • राष्ट्रीय  अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत तसेच पीएम गरीब कल्याण योजनेअंतर्गत अन्न धान्याची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठीही एफसीआय सज्ज-
  • पंतप्रधान @narendramodi यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद.  #COVID2019 चा मुकाबला करण्यासाठी केल्या सूचना. निदान तपासणी,रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध, विलगीकरण यावर भर हवा अशी सूचना केली.
  • जिल्हा स्तरावर आपत्ती व्यवस्थापन गट निर्माण करण्याच्या आवश्यकतेबाबत, आरोग्य सेवा क्षेत्रातल्या मनुष्यबळाचे अप-ग्रेडेशन, ऑन लाईन प्रशिक्षण, स्वयंसेवक यांचा उपयोग याबाबत  पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.
  • एकजूट हे आपले बळ, COVID2019 विरुद्धची लढाई आत्ता सुरू झाली आहे. प्रत्येक नागरिक, सरकारी कर्मचारी यांनी एखाद्या योध्याप्रमाणे हा लढा देण्याची गरज. सर्व धर्म, पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज, पंतप्रधानांनी वरील व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये व्यक्त केली.
  • मुंबईतल्या धारावी परिसरातल्या पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यू बाबत माहिती देताना श्री अगरवाल म्हणाले, “कुटुंबीय आणि इमारतीतील रहिवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध आणि तपासणी या कार्यात 4000 आरोग्य कार्यकर्ते गुंतलेले आहेत. नियमानुसार पावले उचलण्यात येत आहेत”.
  • COVID2019 च्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या आपल्या डॉक्टर आणि इतर वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत आदराने वागण्याची प्रत्येकाला आमची पुन्हा एकदा विनंती. त्यांच्याप्रती कृतज्ञता राखा, भेदभाव करू नका.
  • 1.5 कोटी हुन अधिक PPE साठी आम्ही मागणी नोंदवली आहे,पुरवठा सुरू झाला आहे, परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही राज्यांना पीपीई पुरवत आहोत. देशांतर्गत उत्पादक निश्चित करण्यात आले असून पुरवठा सुरू झाला आहे आणि 1 कोटी पेक्षा अधिक  N95 मास्क, राज्यांना देण्यात आले आहेत-

@PIBMumbai चे प्रेस कॉन्फरन्सचे लाइव ट्वीट पाहण्यासाठी इथे क्लिक करा this thread.

Other updates:

 

Maharashtra update

राज्यात आज कोरोना बाधित 33 नवीन  रुग्णांची नोंद झाली. यातील 30  रुग्ण मुंबईचे, पुणे येथील 2 तर बुलढाण्याच्या 1 रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 335 झाली आहे अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी दिली.  

***

 

M.Chopade/P.Kor



(Release ID: 1610440) Visitor Counter : 226


Read this release in: English