रेल्वे मंत्रालय

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान पार्सल ट्रेनव्दारे मालवाहतुकीला मोठे प्रोत्साहन


आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरात विविध ठिकाणी 30 विशेष पार्सल ट्रेनने वस्तूंची वाहतूक केली

Posted On: 02 APR 2020 5:47PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे आपल्या पार्सल गाडी सेवेद्वारे देशातील नागरिकांना अत्यावश्यक वस्तू आणि इतर गरजेच्या वस्तूंची देशभर वाहतूक करत आहे.

आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशभरात विविध ठिकाणी 30 विशेष पार्सल ट्रेनने वस्तूंची वाहतूक केली आहे.

चांगल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहित होऊन विभागीय रेल्वेने 31 मार्च 2020 पासून वेळापत्रकानुसार पार्सल गाड्या चालवण्यास सुरुवात केली आहे. वेळापत्रकानुसार गाड्यांचे मार्ग खालीलप्रमाणे आहेत:

अणु क्र..

मूळ स्थानक

शेवटचे स्थानक

फेऱ्या/मार्ग

1

बांद्रा टर्मिनस

लुधियाना

आठवड्यातून तीन वेळा (अहमदाबाद, जयपूर, दिल्ली मार्गे)

2

दिल्ली

हावडा

आठवड्यातून दोन वेळा

3

यशवंतपूर

हावडा

आठवड्यातून दोनदा (चेन्नई मार्गे)

4

सिकंदराबाद

हावडा

दर आठवड्याला

5

संक्राईल  (हावडा)

गुवाहाटी

दर आठवड्याला

6

चेन्नई

दिल्ली

दर आठवड्याला

7

कांकरिया (अहमदाबाद )

संक्राईल  (हावडा)

दर आठवड्याला

8

कल्याण

संक्राईल  (हावडा)

दर आठवड्याला (नाशिक, नागपूर, बिलासपुर मार्गे)

9

कल्याण

चांग्सरी

दर आठवड्याला (नाशिक, नागपूर,बिलासपुर मार्गे)

10

करंबेली

चांग्सरी

दर आठवड्याला

 

कोविड-19 विरुद्धच्या लढाईत लॉकडाऊन दरम्यान देशभरात अत्यावश्यक वस्तूंचे जलद गतीने वितरण करण्याच्या सुनिश्चिततेसाठी भारतीय रेल्वे इतर भागातही नवीन मार्ग शोधत आहे.

या काळात ग्राहकांच्या मागणीनुसार भारतीय रेल्वे इतर गाड्याही चालवित आहे - ज्यात पालनापूर (गुजरात) ते पलवल (दिल्ली जवळ) पर्यंत ‘दुध विशेष’, कंकरिया (गुजरात) ते कानपूर (यूपी) आणि संक्राईल (कोलकाताजवळ) अशी दुग्ध उत्पादने आहेत.

स्थानिक उद्योग, ई-कॉमर्स कंपन्या, कोणतेही स्वारस्य असलेले गट, संस्था, व्यक्ती आणि संभाव्य लोडर्स पार्सल ट्रेनच्या सेवा मिळविण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करू शकतात.

 

G.Chippalkatti/S.Mhatre/P.Kor


(Release ID: 1610357) अभ्यागत कक्ष : 106
Read this releasein: English