अर्थ मंत्रालय

कोविड-19 लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य पॉलिसी धारकांना सरकारकडून दिलासा


आरोग्य आणि मोटार विमा  पॉलिसी नुतनीकरणाच्या तारखेला 21 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

Posted On: 02 APR 2020 3:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 एप्रिल 2020

 

कोविड -19 लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर  थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य पॉलिसी धारकांना केंद्रसरकारने  दिलासा दिला आहे. 25 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 या काळात नुतनीकरण तारीख असलेल्या आरोग्य आणि मोटार विमा पॉलिसीसाठी नुतनीकरणाच्या तारखेला 21 एप्रिल 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे केंद्रीय वित्त मंत्रालयाने 1  एप्रिलला या संदर्भात अधिसूचना काढली आहे.

म्हणजेच 25 मार्च ते 14 एप्रिल 2020 या काळात नुतनीकरण तारीख असलेल्या पॉलिसीचे,आता 21 एप्रिल पर्यंत नूतनीकरण करता येईल.    

 

थर्ड पार्टी मोटार विमा

आपल्या  सध्याच्या थर्ड पार्टी मोटार विमा पॉलिसीची मुदत  25 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 या काळात संपत असेल आणि देशव्यापी लॉक डाऊन मुळे आपण नुतनीकरण  करू शकला  नाही तर 21 एप्रिल 2020 पर्यंत आपण याचे नूतनीकरण करू शकता.

 

नियमित आरोग्य विमा पॉलिसी

याचप्रमाणे  आपल्या आरोग्य विम्याची मुदत  25 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 या काळात संपत असून त्याचे  नुतनीकरण या काळात असेल तर 21 एप्रिल 2020 पर्यंत  आपण याचे  नूतनीकरण करू शकता.

 

G.Chippalkatti/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1610275) Visitor Counter : 157


Read this release in: English