आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 बाबत अद्ययावत माहिती

प्रविष्टि तिथि: 01 APR 2020 8:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 एप्रिल 2020

 

देशात कोविड - 19 ला प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन यावर उच्च स्तरावर नियमितपणे देखरेख ठेवली जात आहे आणि राज्ये  / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार विविध उपाययोजना करत आहे. 
केंद्रीय सचिवांनी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लॉकडाउन उपायांचे पालन करताना स्थलांतरित कामगारांच्या स्थितीबाबत समन्वय साधण्याचे आणि व्यवस्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून मदत केंद्रांमध्ये / विलगीकरण  सुविधांमध्ये अन्न, पाणी, वैद्यकीय पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून योग्य ती काळजी घेतली जाईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल स्थलांतरित कामगारांसाठी योग्य विलगीकरण तसेच मानसिक-सामाजिक उपाययोजनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या

https://www.mohfw.gov.in/pdf/RevisedPsychosocialissuesofmigrantsCOVID19.pdf.  वर उपलब्ध आहेत.
माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्यांना निर्देश देण्यात आले आहेत की प्रशिक्षित समुपदेशक आणि / किंवा सर्व धर्मांच्या समुदाय गट नेत्यांनी मदत शिबिरांना भेट देऊन स्थलांतरितांना मानसिक-सामाजिक मदत पुरवावी.  माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार,तांत्रिक शंकांसाठी आरोग्य मंत्रालयाने एक ईमेल ((technicalquery.covid19[at]gov[dot]in) उपलब्ध करून दिला असून यावर नवी दिल्लीतील एम्स सारख्या संस्थांकडून शंकांना विश्वासार्ह  माहिती दिली जाईल.  सर्व  मार्गदर्शक तत्त्वे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://www.mohfw.gov.in/)) देखील उपलब्ध आहेत.  कोविड -19 संबंधित प्रश्नांसाठी टोल फ्री क्रमांक (1075) आणि हेल्पलाइन ईमेल आयडी (ncov2019[at]gov[dot]in)  यापूर्वीच  कार्यरत आहेत.
याव्यतिरिक्त, राष्ट्रीय औषधनिर्माण मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) अधिसूचित केले आहे की औषध (मूल्य  नियंत्रण) आदेश 2013  च्या तरतुदीअंतर्गत गुणवत्ता नियंत्रण आणि मूल्य देखरेखीसाठी सर्व 24 प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांचे औषधे म्हणून नियमन केले जाईल आणि 1 एप्रिल  2020 पासून याची अंमलबजावणी केली जाईल , जेणेकरून कुणीही उत्पादक या वस्तूंची  एमआरपी गेल्या 12 महिन्यांतील एमआरपीच्या 10% पेक्षा जास्त वाढवू शकणार नाहीत.  
आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेमध्ये स्वतः  काळजी घेण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांसाठी उपाययोजना सुचवल्या आहेत ज्या कोविड -19 च्या आपत्कालीन स्थितीत श्वसनासंबंधी प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करेल.
लॉकडाउन, प्रस्तावित सामाजिक अंतर ठेवण्यासंबंधी सूचनांचे पालन करण्यावर  आणि धार्मिक संमेलनांसाठी मोठ्या संख्येने एकत्र जमणे टाळण्यावर भर  देण्यात आला आहे.
आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 1637 वर गेली असून या रोगामुळे 38 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 376 नवीन रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 132 लोक या आजारातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.


G.Chippalkatti/S.Kane/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1610058) आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English