मंत्रिमंडळ सचिवालय

सर्व राज्यांचे मुख्य सचिव / डीजीपींसोबत केंद्रीय सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

Posted On: 01 APR 2020 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 एप्रिल 2020

 

सर्व राज्यांचे मुख्य सचिव / डीजीपींसोबत केंद्रीय सचिवांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्‍यात आली.

  • तबलीगी जमातच्या कार्यकर्त्यांचा कसून शोध घेण्याबाबत राज्यांना अवगत करण्यात आले. कारण या कार्यकर्त्यांमुळे कोविड-19 रोखण्याच्या प्रयत्नांचा अडथळा वाढला आहे. राज्यांना युद्धपातळीवर ही शोध मोहीम हाती घ्यायला सांगण्यात आले.
  • तबलीगी जमात संमेलनात सहभागी झालेल्या परदेशी लोकांनी व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. व्हिसा अटींचे उल्लंघन केल्याबद्दल  परदेशी लोक आणि कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात राज्यांना कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.
  • पुढल्या आठवड्यापर्यंत पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करायलाही राज्यांना सांगण्यात आले. यामध्ये लाभार्थ्यांना मोठ्या रकमेच्या रोख हस्तांतरणाचा समावेश असेल. सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी योग्य पद्धतीने याचे आयोजन करायला सांगण्यात आले 
  • देशभरात लॉकडाउनची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सामाजिक अंतर राखताना वस्तू आणि मालाच्या आंतरराज्यीय वाहतुकीला कोणत्याही अडथळ्याशिवाय परवानगी देण्याच्या सूचना  राज्यांना देण्यात आल्या.
  • जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनाकडे लक्ष देण्यात यावे. अशा वस्तूंची पुरवठा साखळी कायम राखली जाईल याचीही खबरदारी घेतली जायला हवी.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane


(Release ID: 1609975) Visitor Counter : 204


Read this release in: English