सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन आरोग्य परिस्थिती दरम्यान दिव्यांगजणांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी सर्वंकष दिव्यांगता सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी डीईपीडब्ल्यूडीने पीडब्ल्यूडीएससाठी राज्य आयुक्तांना पत्र लिहिले

Posted On: 31 MAR 2020 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मार्च 2020

 

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयांतर्गत कार्यरत दिव्यांगाजन सशक्तीकरण विभागाने (डीईपीडब्ल्यूडी) सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या दिव्यांगजनांशी संबंधित राज्य आयुक्तांना पत्र लिहून कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आपत्कालीन आरोग्य परिस्थिती दरम्यान दिव्यांगजनांच्या सुरक्षा आणि सुरक्षिततेसाठी डीईपीडब्ल्यूडी द्वारे 26 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या दिव्यांगता सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणी नुसार दिव्यांगजनांचे काळजीवाहक आणि स्वयंसेवी संस्थाना पास जारी करण्यास सांगितले आहे.

लॉकडाऊन काळात दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास कमी करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राज्य आयुक्तांना त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्य नोडल प्राधिकारी म्हणून काम करत राज्य/जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आरोग्य आणि कायदा अंमलबजावणी प्राधिकरण यासारख्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी निकट समन्वय साधत सेवा प्रदान केल्या पाहिजेत. राज्य आयुक्त वरील मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने काम करत आहेत अशी आशा आहे.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, (a) लॉकडाऊन दरम्यान दिव्यांग व्यक्तींचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्यक्रमाने सोप्या पद्धतीने स्थानिक प्रवास पास जारी करणे आवश्यक आहे, आणि (b) दिव्यांग व्यक्तींना आवश्यक अन्न, पाणी, औषध उपलब्ध करून देणे देखील गरजेचे आहे. पुढे असे देखील निदर्शनाला आले आहे की, स्वयंसेवी संस्था आणि पीडब्ल्यूडीएस संघटना देखील दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन आयुष्यात आणि जीवनावश्यक वस्तूंमध्ये सहाय्य करतात. पीडब्ल्यूडीएसना मदत सेवा सुरळीत पद्धतीने उपलब्ध होण्यासाठी या संघटनांशी समन्वय साधने गरजेचे आहे.

स्वयंसेवी संस्था/पीडब्ल्यूडी संघटना/काळजीवाहक आदींना प्रवास पास जारी न केल्यामुळे पीडब्ल्यूडीएसना काळजीवाहक, सेवकांकडून सेवा मिळण्यात आणि जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होण्यात त्रास सहन करावा लागत आहे अशा तक्रारी डीईपीडब्ल्यूडीकडे येत आहेत. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सेवा मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून दिव्यांग व्यक्तींशी संबधित राज्य आयुक्तांनी सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांना संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दिव्यांगजन संघटना/स्वयंसेवी संस्था/काळजीवाहक यांना पास जारी करण्याची विनंती केली आहे. त्यांना यासंदर्भात स्थानिक कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी (पोलिस / एसडीएम इ) संवेदनशील राहण्याची विनंती केली आहे. डीईपीडब्ल्यूडीने त्यांना सांगितले आहे की कोविड-19 चे रुग्ण रूग्णालय आणि आरोग्य सेवा संस्थांकडून बाहेर जाता कामा नये.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane


(Release ID: 1609847) Visitor Counter : 122


Read this release in: English