शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने जेईई अर्थात संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) एप्रिल -2020 पुढे ढकलली
Posted On:
31 MAR 2020 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 5, 7 ते 9 आणि 11 एप्रिल 2020 रोजी होणाऱ्या जेईई (मुख्य) एप्रिल 2020 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत, दिनांक 18.03.2020 रोजी जारी केलेल्या सार्वजनिक अधिसुचने च्या अनुषंगाने एनटीएने आज अधिसूचित केले आहे की, सध्या तरी ही परीक्षा मे २०२० च्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. आगामी काळात परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नेमकी तारीख जाहीर केली जाईल.
लवकरच परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतांना एनटीएने म्हटले आहे की सध्याच्या परिस्थितीत वेळापत्रकात काही बदल करण्याची गरज भासल्यास त्यानुसार निर्णय घेण्यासाठी एनटीए परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.
त्यानुसार, त्यावेळच्या परिस्थितीच्या आधारे आता 15 एप्रिल 2020 नंतर परीक्षेसाठी प्रवेशपत्रे दिली जातील.
एनटीए विद्यार्थ्यांना ताज्या घडामोडींबद्दल वेळोवेळी माहिती देतच राहतील. त्याचबरोबर परीक्षेच्या तारखांच्या बदलांविषयी आणि परीक्षेच्या नेमक्या तारखांविषयी त्यांना अगोदर कळविण्यात येणार आहे.
उमेदवारांना आणि त्यांच्या पालकांना ताज्या माहितीसाठी jeemain.nta.nic.in आणि www.nta.ac.in संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देण्याचा सल्ला दिला जात आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार 8287471852, 8178359845, 9650173668, 9599676953, 8882356803 वर संपर्क साधू शकतात.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1609674)
Visitor Counter : 117