कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
लॉकडाऊन’ दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षण प्रसार योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना पूर्ण वेतन मिळणार: डॉ. महेंद्रनाथ पांडे
Posted On:
31 MAR 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
कोविड-2019 मुळे जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात राष्ट्रीय प्रशिक्षण प्रसार योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनूसार राष्ट्रीय प्रशिक्षण प्रसार योजनेंतर्गत येणारी सर्व नियुक्त व वैकल्पिक अस्थापने आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना पूर्ण वेतन देतील आणि या वेतनाचा परतावा सरकारकडून होईल, अशी माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेन्द्रनाथ पाण्डे यांनी आज दिली.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांनी अशा सर्व अस्थापनांना तशी नोटिस पाठवली आहे. प्रशिक्षणार्थी कायदा 1961 नूसार व प्रशिक्षण नियमानूसार लॉकडाऊन, संप किंवा टाळेबंदीच्या काळात, त्या संपूर्ण कालावधीत अथवा जास्तीत जास्त सहा महिने, (जो कालावधी कमी असेल) पूर्ण वेतन देणे बंधनकारक आहे.
G.Chippalkatti/S.Pophale/P.Kor
(Release ID: 1609657)
अभ्यागत कक्ष : 125