विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सार्स-कोव्ह-२ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर अंकुश ठेवण्यासाठी घरगुती मास्क वापराबाबत प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने जारी केली मार्गदर्शक पुस्तिका
डीएसटी, डीबीटी, सीएसआयआर, डीएई, डीआरडीओ आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) अंतर्गत असलेल्या संस्थांना मानक आणि काटेकोर नियमावलीनुसार त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळा स्थापन करून संशोधन आणि चाचणीसाठी परवानगी देणारे हे ज्ञापन
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी ठरविलेल्या प्राधान्यांनुसार चाचणीची पातळी निश्चित करणार
संशोधनाचे नियोजन हे अल्प आणि मध्यम अवधीसाठी करण्यात येणार
Posted On:
31 MAR 2020 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2020
सार्स-कोव्ह-२ कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर अंकुश ठेवण्यासाठीच्या घरगुती मास्क वापराबाबत प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने विस्तृत मार्गदर्शक पुस्तिका जारी केली आहे.
हे मास्क तेव्हाच परिणामकारक ठरू शकतात जेव्हा वापरकर्ता वारंवार अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने या मार्गदर्शक पुस्तिकेत लिहिले आहे. यात असेही म्हटले आहे कि जर तुम्ही मास्क वापरत असाल तर ते कसे वापरायचे आणि वापरून झाल्यावर योग्य प्रकारे कसे नष्ट करायचे, हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
जेव्हा 50 % लोक मास्क वापरतात तेव्हा 50 % लोकसंख्याच विषाणूबाधित होऊ शकते. जेव्हा 80 % नागरिक मास्कचा वापर करतील तेव्हा विषाणूचा प्रादुर्भाव तात्काळ थांबेल, असे विश्लेषण यात केले आहे.
मास्क का वापरायचा, या प्रश्नावर यात असे लिहिले आहे कि कोविड-19 विषाणू हा परस्पर संपर्काने पसरतो. विषाणू वाहून नेणारे थेंब अतिशय जलद सुकतात आणि त्याचे केंद्रक बनून ते हवेवाटे कोणत्याही पृष्ठभागावर स्थिरावते. कोविड-19 या आजारास कारणीभूत असलेला विषाणू सार्स-कोव्ह-२ हा एरोसोलमध्ये तीन तास तर प्लास्टिक आणि स्टेनलेस स्टील पृष्ठभागावर तो तीन दिवस कार्यशील असतो. (N.Engl J.Med. 2020)”.
मास्कचा वापर केल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णामार्फत हवेतील थेंबांद्वारे हे विषाणू श्वसन मार्गात येण्याचा धोका कमी होतो, असे या पुस्तिकेत म्हटले आहे. उष्णता, अतीनील किरण, पाणी, साबण आणि अल्कोहोल यांचा योग्य वापर करून मास्क स्वच्छ धुवून वापरल्यास श्वसननलिकेत विषाणूच्या प्रवेशाचा धोका कमी होतो.
मास्कचा वापर किंवा पुनर्वापर कसा करता येईल जेणेकरून वैयक्तिकरित्या किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत याची निर्मिती करून त्याच्या वापराबाबत देशव्यापी प्रचार, प्रसार करणे हा या पुस्तिकेचा उद्देश आहे. मास्कसाठी लागणाऱ्या वस्तूंची सहज उपलब्धता, घरीही सुलभतेने बनवता येतील तसेच त्याचा वापर आणि पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने मास्कची रचना कशी असावी, हा या पुस्तिकेचा मूलमंत्र आहे. देशातील दाट लोकवस्ती असणाऱ्या ठिकाणी, या मास्कचा वापर प्रामुख्याने व्हावा, असे यात म्हटले आहे.
भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने त्यांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि कोविड -19 संदर्भात दिलेल्या आधीच्या माहितीनुसार विज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षम समितीने कोविड -19 विरोधात वैज्ञानिक उपायांच्या अंमलबजावणीच्या दिशेने वेगाने कार्य केले आहे. कोविड -19 च्या परीक्षणासाठी चाचणी सुविधांची जास्तीची गरज लक्षात घेऊन तशी कार्यवाही करण्यात आली आहे. डीएसटी अर्थात विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, डीबीटी, विज्ञान आणि संशोधन परिषद (सीएसआयआर), अणु ऊर्जा विभाग (डीएई), संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) अंतर्गत असलेल्या संस्थांना मानक आणि काटेकोर नियमावलीनुसार त्यांच्या स्वतःच्या प्रयोगशाळा स्थापन करून संशोधन आणि चाचणीसाठी परवानगी या मार्गदर्शक पुस्तिकेद्वारे कार्यालयाने दिली आहे तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांनी ठरविलेल्या प्राधान्यांनुसार चाचणीची पातळी निश्चित करण्यात येणार असून संशोधनाचे नियोजन हे अल्प आणि मध्यम अवधीसाठी करण्यात येणार आहे.
19 मार्च 2020 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान सक्षमीकरण समिती स्थापन करण्यात आली. नीती आयोगाचे सदस्य प्रा.विनोद पॉल आणि भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजय राघवन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. विविध वैज्ञानिक संस्था, वैज्ञानिक, उदयोग आणि नियामक संस्था यांच्याशी समन्वय साधून कोविड 19 आजार आणि सार्स-कोव्ह-२ कोरोना विषाणूशी निगडित उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी संशोधनावर जलदगतीने निर्णय घेण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
खाली घरगुती मास्क वापरण्याविषयी तपशीलवार पुस्तिका आहे (आधी जारी केलेली पुस्तिका बदलून)
('सार्स-कोव्ह-२ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर' याविषयी इथे जोडलेली पुस्तिका कृपया अवश्य पहा.)
U.Ujgare/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1609519)
Visitor Counter : 186