माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दूरचित्रवाणीचे सुवर्णयुग पुन्हा एकदा आणण्यासाठी दूरदर्शन तयार


केबल चालकांना दूरदर्शन वाहिन्या, लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्या दाखवणे अनिवार्य करण्यासंबंधी माहिती आणि प्रसारण मंत्रायलाकडून निर्देश जारी

Posted On: 30 MAR 2020 6:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

 

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेला घरामध्ये राहणं जास्त आनंददायी व्हावं, यासाठी दूरदर्शनने आपले सुवर्णयुग पुन्हा एकदा आणण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यानुसार काही वर्षांपूर्वी जनसामान्यांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेल्या काही मालिकांचे पुन्हा प्रसारण करण्याचे वेळापत्रक दूरदर्शनने तयार केले आहे. याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

1.    चाणक्य - चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘चाणक्य’ या 47 भागांच्या मालिकेचे एप्रिल, 2020च्या पहिल्या सप्ताहापासून ‘डीडी भारती’या वाहिनीवर दुपारच्या वेळेत प्रसारण करण्यात येणार आहे.

2.    उपनिषद गंगा - चिन्मय मिशन ट्रस्टच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या आणि चंद्रप्रकाश व्दिवेदी यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिकेच्या 52 भागांचे एप्रिल, 2020च्या पहिल्या सप्ताहापासून ‘डीडी भारती’या वाहिनीवर दुपारच्या वेळेत प्रसारण करण्यात येणार आहे.

3.    शक्तिमान - मुलांमध्ये कमालीची लोकप्रिय ठरलेल्या आणि मुकेश खन्ना यांनी मुख्य पात्र रंगवलेल्या ‘शक्तिमान’ या मालिकेचे डीडी नॅशनल या वाहिनीवर एप्रिल, 2020 पासून रोज दुपारी 1.00 वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

4.    श्रीमान श्रीमती - मकरंद अधिकारी यांची निर्मिती असलेल्या ‘श्रीमान श्रीमती’ या हास्य मालिकेचे प्रसारण डीडी नॅशनल वर एप्रिल, 2020 पासून रोज दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे.

5.    कृष्णा काली - ही 18 भागांची मालिका रोज रात्री 8.30 वाजता डीडी नॅशनलवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

दूरदर्शनने काही मालिकांचे पुन्हा प्रसारण याआधीपासूनच म्हणजे दि. 28 मार्च, 2020 पासून सुरू केले आहे. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

1.    रामायण - रामानंद सागर यांनी निर्माण केलेल्या ‘रामायण’ या   एकूण मालिकेचे 78 भाग (एक भाग 35 मिनिटांचा) आहेत. सध्या डीडी नॅशनल या वाहिनीवर दररोज सकाळी 9.00 वाजता आणि रात्री 9.00 ‘रामायण’ ही मालिका दाखवली जात आहे.

2.    महाभारत - रोज दुपारी 12.00 वाजता आणि सायंकाळी 7.00 वाजता 97 भागांची (एक भाग 45 मिनिटांचा) ही मालिका प्रसारित करण्यात येत आहे.

3.    व्योमकेश बक्षी - 52 भागांच्या या मालिकेचा एक तासाचा एक भाग रोज सकाळी 11.00 वाजता दाखवण्यात येत आहे.

4.    सर्कस - शाहरूख खान याची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘सर्कस’ या मालिकेचे प्रसारण रोज रात्री 8.00 वाजता करण्यात येत आहे. ‘सर्कस’चे  एकूण 19 भाग आहेत.

5.    हम है ना - या 60 भागांच्या मालिकेचे प्रसारण डीडी नॅशनल नेटवर्कवरून रोज रात्री 10.00 वाजता केले जात आहे.

6.    तू तोता मैं मैना - या 26 भागांच्या मालिकेचे  प्रसारण डीडी नॅशनल नेटवर्कवरून रोज रात्री 10.00 वाजता केले जात आहे.

केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमन कायद्यानुसार देशभरातल्या सर्व डीटीएच केबल चालकांना दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसेच लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्या दाखवणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग केल्याचे आढळल्यास या कायद्यातील कलम 11,12 आणि 18 अंतर्गत कारवाई केली जाईल.

देशभरामधल्या दूरदर्शन प्रेक्षकांपैकी जर कोणालाही केबल चालकांमुळे आपल्याला हवे असणारी डीडी वाहिनी पाहता आली नाही. तर त्यांनी आपल्या जवळच्या दूरदर्शन केंद्रप्रमुखांकडे त्याची माहिती द्यावी. किंवा ddpb.inform[at]gmail[dot]com  या ई-मेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी. असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका पत्रकाव्दारे केले आहे.

 

B.Gokhale/ S.Bedekar/P.Kor


(Release ID: 1609508) अभ्यागत कक्ष : 233
Read this releasein: English