पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

कोविड-19 च्या पुरवठा साखळीत स्वयंपाकाच्या गॅसचा घरोघरी पुरवठा करणाऱ्या डिलिव्हरी सेवकांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची तेल विपणन कंपन्यांची घोषणा


धर्मेंद्र प्रधान यांनी केले निर्णयाचे स्वागत

Posted On: 30 MAR 2020 7:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून, घरोघरी गॅसचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत, काही दुर्दैवी घटना(मृत्यू) झाल्यास त्यांना मदत म्हणून 5 लाख रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या IOCL, BPCL आणि HPCL यांनी केले आहे. या काळात सेवा देणारे सर्व कर्मचारी, म्हणजे दुकानातील सेवक वर्ग, गोदामातील कामगार, डिलिव्हरी कर्मचारी अशा सर्वांना हे अनुदान लागू असेल.

स्वयंपाकाचा गॅस ही अत्यावश्यक वस्तू असल्याने लॉकडाऊनमधून त्याच्या पुरवठ्याला वगळण्यात आले आहे. आणि या कसोटीच्या काळात या क्षेत्रातील कर्मचारी ही पुरवठा साखळी सुरळीत चालू राहावी म्हणून कार्यरत आहेत.

तेल कंपन्यांच्या या निर्णयाचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वागत केले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी घेतलेला हा निर्णय मानवतेच्या दृष्टीकोनातून कौतुकास्पद असून, या काळात सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांप्रती सद्‌भावना व्यक्त करणारा आहे. आपल्या सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांचे हित जपणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. असे प्रधान यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1609357) Visitor Counter : 207


Read this release in: English