सांस्कृतिक मंत्रालय

देशातील संपूर्ण बंदीच्या वातावरणात 66 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय आधुनिक कला प्रदर्शन (एनजीएमए) संस्थेने कलाप्रेमींना कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालय बघता यावे म्हणून केली आभासी फेरफटक्याची व्यवस्था


भविष्यातील अशा असामान्य परिस्थितीचा विचार करून एनजीएमएने प्रथमच केली अशी कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालयाच्या आभासी फेरफटक्याची सोय

Posted On: 30 MAR 2020 4:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

नॉव्हेल कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांच्या संपूर्ण बंदीचा निर्देश जारी असल्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील सर्व वस्तुसंग्रहालये आणि ग्रंथ संग्रहालये जनतेसाठी बंद करण्यात आली आहेत. यामुळे एनजीएमए अर्थात राष्ट्रीय आधुनिक कला प्रदर्शन संस्थेमधील कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालय बघण्यासाठी कलाप्रेमी प्रत्यक्ष तेथे जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत जनतेची अडचण दूर करण्यासाठी एनजीएमएने 66  व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवारी गॅलरीत कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालयाचा फेरफटका मारल्याचा आनंद देणाऱ्या आभासी दर्शनाची व्यवस्था सुरु केली. संस्थेने स्थापनेपासून यावर्षी प्रथमच अशा प्रकारच्या आभासी फेरफटक्याची सोय दर्शकांना उपलब्ध करून दिली आहे. येथील कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालयात सर्जनशील आणि आधुनिक कलाकारांच्या कुशाग्र बुद्धीतून तयार झालेल्या अद्वितीय वस्तूंचे भांडार आहे असे संस्थेचे महासंचालक अद्वैत गडनायक यांनी सांगितले. 

आभासी फेरफटका मारताना प्रेक्षकांना अनेक नवनवीन कलावस्तूंच्या सौंदर्याचा शोध लागत जाईल असे ते म्हणाले. या आभासी प्रवासातून प्रेक्षकांना आमच्या मौल्यवान संग्रहातील अनेक कलावस्तूंमधील लपलेली सौंदर्यस्थळे निदर्शनास येतील. हा आभासी फेरफटका म्हणजे आम्ही आधुनिक कलाकारांना वाहिलेली श्रद्धांजली असून संग्रहाचे दर्शन घेतल्यानंतर प्रेक्षक शिल्पकला, चित्रकला आणि छापील कलांमध्ये सर्जक मध्यम म्हणून रस घेऊ लागतील असे ते म्हणाले. आभासी फेरफटक्यासाठी कलाप्रेमी खालील लिंक वापरू शकतात:

http://www.ngmaindia.gov.in/index.asp

 

 

B.Gokhale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1609274) Visitor Counter : 97


Read this release in: English