नौवहन मंत्रालय
मालाच्या आयात- निर्यातीसाठी बंदरात उतरवण्यात आलेल्या कंटेनरना अतिरिक्त शुल्क न आकारण्याबाबत नौवहन मंत्रालयाच्या सर्व सागरी मालवाहतूक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना
प्रविष्टि तिथि:
29 MAR 2020 6:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2020
मालाच्या आयात- निर्यातीसाठी बंदरात उतरवण्यात आलेल्या कंटेनरना त्यांच्या करारातील अटीनुसार निश्चित निःशुल्क कालावधी व्यतिरिक्त अधिक काळासाठीच्या व्यवस्थेसाठी 22मार्च 2020 ते 14 एप्रिल2020 (या दोन्ही तारखा धरून) अतिरिक्त शुल्क न आकारण्याबाबत नौवहन मंत्रालयाने सर्व सागरी मालवाहतूक कंपन्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. भारतीय बंदरांवर मालाचा पुरवठा सुरळीत रहावा या उद्देशाने या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत मालवाहतूक कंपन्यांनी कोणतेही नवीन किंवा अतिरिक्त शुल्क आकारू नये असाही सल्ला देण्यात आला आहे. कोविड-19 च्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घेतलेला हा तात्पुरता निर्णय आहे.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर 25 मार्च 2020रोजी केलेल्या लॉकडाउनच्या घोषणेनंतर सागरी मालवाहतूक सेवेवर परिणाम झाला ज्यामुळे बंदरांमधून माल बाहेर काढण्यास थोडा विलंब झाला.याचा परिणाम म्हणून काही सागरी मालवाहतूक कंपन्यांचे काम ठप्प झाले किंवा त्यांची काहीही चूक नसताना मालवाहतूक आणि त्यांचे कागदोपत्री व्यवहार पूर्ण करता न आल्याने कंटेनर बंदरात थांबवावे लागले. या मार्गदर्शक सूचनांमुळे व्यापार आणि देशातील वस्तू पुरवठा साखळी सुरळीत सुरु राहील.
U.Ujgare/V.Joshi/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1609057)
आगंतुक पटल : 151
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English