संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी पीएम-केअर्स निधीसाठी जमा करणार एक दिवसाचा पगार, 500 कोटींचे योगदान अपेक्षित

Posted On: 29 MAR 2020 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 29 मार्च 2020 


संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी Covid-19 वर मात करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार पीएम-केअर्स निधीसाठी देण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाचे विविध विभाग जसे सैन्यदल, नौदल, हवाईदल, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्यम यांचे योगदान 500 कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित आहे. 

कर्मचाऱ्यांचे योगदान हे ऐच्छिक असून ज्यांना यात सहभागी व्हायचे नाही त्यांना तशी सूट देण्यात आली आहे. 

 


R.Tidke/S.Thakur/D.Rane
 


(Release ID: 1609035) अभ्यागत कक्ष : 188
Read this releasein: English