पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी एक महिन्याचे वेतन
Posted On:
29 MAR 2020 3:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 मार्च 2020
केंद्रीय पेट्रेलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी COVID-19 मुळे निर्माण झालेल्या संकटावरील मदतकार्यासाठी आपले एक महिन्याचे वेतन पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीसाठी दिले आहे. ट्वीटरवरील संदेशात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे, “#Covid-19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता मी एक महिन्याचे वेतन आणि खासदारनिधीतून एक कोटी रुपये वंचितांच्या चेहऱ्यावरील हास्य परत आणण्यासाठी दिले आहेत.”
R.Tidke/S.Thakur/D.Rane
(Release ID: 1608998)
अभ्यागत कक्ष : 163